व्यवसायजन्य आजार आणि त्यावरील उपचार : भाग ३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
 
 
 
मागील लेखात हवाईसुंदरींच्या आरोग्याविषयी आपण चर्चा केली होती.विमानातील वातावरणामुळे आणि त्यातील विविध वायुंमुळे श्वसनसंस्थेवर आणि त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. याबद्दल मागील लेखात सविस्तर वर्णन केले होते. हवाईसुंदरीच्या कामाच्या पद्धतीमुळे आणखी काही वेगळ्या तक्रारीही उद्भवतात. आज त्याची सविस्तर माहिती करुन घेऊया...
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

हवाईसुंदरींना ‘Emergency Handling’ चे प्रशिक्षण दिले जाते. विमानात तांत्रिक बिघाड झाला, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांना प्राधान्याने धावपळ करावी लागते. तसेच ‘Faulty on board entertainment system’ असल्यास, उर्मट प्रवासी असल्यास, दहशतवादी विमानात असल्यास, Medical emergency जसे ( हृदयविकाराचा झटका) Heart attack, on Board Birth / Labour शारीरिक-मानसिक विकृती असलेले प्रवासी असल्यास त्यांना मदत करणे, अल्पवयीन प्रवाशांची काळजी इ. सर्व गोष्टी हवाईसुंदरींना अगदी हसत-खेळत कराव्या लागतात. हवाईसुंदरींना सतत हसतमुख आणि टापटीप राहावे लागते. मानसिक घालमेल, ताण, दु:ख कितीही असले, तरी ते चेहऱ्यावर उमटणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागते.

 

हवाईसुंदरीचे वेळापत्रक खूप अनियमित असते. आठवड्यातून एक दिवस सुट्टी आणि तो दिवसही अनिश्चित. लांबचा प्रवास असल्यास किंवा दोन ड्युटी किंवा शिफ्टमध्ये काम असल्यास रोज घरी येणे शक्य नसते. तसेच शारीरिक सुंदरताही त्यांना जपावी लागते. त्यासाठी काटेकोरपणे आहारावर नियंत्रण आणि व्यायामाची गरज असते. पण ते नेहमीच शक्य होते असेही नाही. Faulty Dieting Fads, crash dieting मुळे विविध घटकांची शरीरात कमतरता (Deficiencies) उद्भवते. याने चिडचिड वाढू शकते. तसेच त्वचेवरचे तेज, तुकतुकीतपणासुद्धा नाहीसा होतो. केस गळणे, कृश होणे हेदेखील faulty dietary habit हरलळीं मुळे होते. मग केसांची आणि त्वचेची कमतरता झाकण्यासाठी, लपविण्यासाठी विविध प्रसाधनांचा भडीमार केला जातो. जेवढे तास ड्युटी तेवढे तास मेकअप आणि केस बांधलेले असतात. काही वेळेस गणवेशाबरोबर टोपीही घातली जाते. यामुळे नैसर्गिक रोमरंध्र (skin pores) बंद राहतात. बाहेरील वातावरणाशी देवाणघेवाण होत नाही. यामुळे त्वचेतील रक्तपुरवठा नीट होत नाही. घामावाटे काही अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकले जातात. ते या बंद रोमरंध्रांमुळे घडत नाही. मग त्वचेवर पुरळ, तारुण्यपीटिका वाढणे, त्वचा कोरडी-तेलकट राहणे इ. लक्षणे वाढतात. त्यातच Light/ Sun Exposure lonizing Radiation, Hydrocarbons इ. मुळे अन्य व्यक्तींपेक्षा व्यवसायजन्य आजार हवाईसुंदरींमध्ये तीन ते दहा पट अधिक skin relaled disorders and Skin cancer होतो, असे अभ्यासांती CDC (Cancer for Disease Control) मधून पुढे आले आहे.

 

कामाच्या शिफ्ट्स वारंवार बदलल्यामुळे शरीराचे ठरलेले वेळापत्रक कोलमडते. (circadian rhythm) यामुळे Shift- work sleep disorders उद्भवतात. हवाई उड्डाणाच्या सेवेत कार्यरत झाल्यापासून सहा ते 24 महिन्यांमध्ये मासिक रजःप्रवृत्तीचे कालचक्र बिघडते. तसेच हवाईसुंदरींना गर्भावस्था असतेवेळी उड्डाण करता येत नाही. म्हणून गर्भधारणा होणे त्या टाळतात. गर्भावस्थेत गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते किंवा preterm delivery होण्याची शक्यता अधिक असते. हे टाळण्यासाठी circadian rhythmचे सातत्य राखणे हे गरजेचे आहे. त्यामुळे खूप ताण घेऊ नये.

 

हवाईसुंदरींना घरातून भक्कम पाठबळ मिळणे गरजेचे आहे. अनियमित कामांच्या तासांमुळे बऱ्याच कौटुंबिक सणा-समारंभांना त्या उपस्थित राहू शकत नाहीत. रोजच्या रोज घरी न जाणे, मुलांशी-नवर्‍यांशी नातेवाईकांशी संवाद न होणे, छोटी-मोठी आजारपणे आणि इमरजन्सीवेळी घरी वेळेत न येणे या सगळ्यांचाही हवाईसुंदरींच्या मानसिकतेवर परिणाम होतो. मुलांना लहान वयातच मातृस्नेह कमी मिळाल्याने ते आईबरोबर ते दृढ नाती निर्माण करू शकत नाहीत. तो जिव्हाळा, ती आपुलकी त्यांच्यात कमी प्रस्थापित होते. याची सलही हवाईसुंदरींना खूप वेळा राहते. ही सर्व घालमेल सुरू असतानाही मुखावर स्मित आणि मितभाषी राहणे म्हणजे मुखवटा घालून फिरण्यासारखेच आहे. या अंतर्बाह्य विपरीततेत राहण्याने मानसिक कुचंबणा अधिक होते. मानसिक ताणाचा परिणाम हा शरीरावर आणि त्याच्या दैनंदिन कार्यावर उमटतो. झोपेची कमतरता, कमी झोप इ. ने यात अधिक भर पडते. मानसिक स्वास्थ्यावर शारीरिक स्वास्थ अवलंबून असते. बरेचशा शारीरिक व्याधी या मानसिक अस्वास्थ्यातून उत्पन्न होतात. जसे आम्लपित्त, cervical spondylosis, केस गळणे, उच्चरक्त दाब, झोपेच्या तक्रारी इ. अंत:स्रावी ग्रंथीचा अनियमित स्राव. मानसिक अस्वास्थ्यात बिघाड आणि या स्रावांचे प्रमाण कमी-अधिक झाल्याने ताणतणावाशी सामना करणे कठीण आहे.

 

बहुतांशी हवाईसुंदरींचा पोषाख हा तंग असतो. शरीर अधिक काळ आवळलेले राहते. याचा परिणाम अंत:प्रदेशी असलेल्या अवयवांवर होतो (internal organs) उदा: फुफ्फुसे जर आवळली जात असतील तर त्यातील वायविय देवाणघेवाण (exchange of gases) सुरळीत होऊ शकत नाही. फुफ्फुसेही आपल्या क्षमतेपेक्षा कमी कार्य करु लागतात. परिणामी श्वास अपुरा पडणे, दम लागणे, धाप लागणे इ. लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. तसेच पोट आवळल्याने पोटाच्याही नैसर्गिक चलनवलनात(peristaltic movement) बाधा उत्पन्न होऊ शकते. हवाईसुंदरीची व्यावसायिक गरज म्हणजे तारुण्याचे चिरकालीन जतन करणे. यासाठी शारीरिक व मानसिक बंधन पाळावी लागतात. नैसर्गिकरित्या विशीतले सौंदर्य तीशीत आणि उठावदार स्वास्थ्य चाळीशीत टिकत नाही आणि ते टिकविण्यासाठी आटापिटा केला जातो. व्यवसायात चुरसही खूप असते. थोड्या कालावधीत खूप आत्मसात करण्याची घोडदौडच जणू लागलेली असते. या व्यवसायात आर्थिक मोबदला उत्तम असतो. पण, तो मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी खूप कष्ट आहेत आणि ते कायम घ्यावे लागतात. तिशीमध्ये प्रकृतित: कंबरेचा घेर थोडा वाढतो. तिशी-पस्तीशीत चेहऱ्याचा गोडवा-निरागसता लोप पावते. पण त्याचे जतन, रक्षण आणि ती पुन्हा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न खूप खर्चिक तर असताततच, पण नेहमीच सकारात्मक निकाल मिळेलच असे नसते.

 

प्रत्येक व्यक्तीमध्ये वयानुरूप बदल होतात आणि ते बदल वेळेतच स्वीकारणे गरजेचे आहे. काही गोष्टींच्या मागे पळणे म्हणजे मृगजळाच्या पाठी जाण्यासारखे आहे. समतोल राखणे - व्यवसायात आणि आपल्या आयुष्यात हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती भिन्न असते. स्वभाव वेगळा असतो आणि गरजाही त्यानुसार बदलतात. काहींना आर्थिक स्वातंत्र्य अधिक गरजेचे असते, तर काहींना कौटुंबिक सहवास हवा असतो, काहींना स्वत:च्या पायावर उभं राहून काहीतरी बनायचं असतं, काही मिळवायचं असतं, तर काहींचा अजून वेगळा मार्ग असतो. प्रत्येकाने आपल्याला काय हवंय हे ठरवावे. एक करतोय म्हणून दुसऱ्याने अनुकरण केले, तर अंती वैफल्य येते. पण, सद्सद्विवेकबुद्धीने जर विचार केला, तर प्रत्येकाला आपल्या जीवनात सुवर्णमध्य गाठणे शक्य असते.

 

(क्रमश:)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@