जिल्हा परिषदेत ग्रामपंचायतीची पंचायत

    29-Sep-2018
Total Views |

वसुलीच्या अफरातफरींबाबत विभागीय आयुक्तांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर


 
जळगाव : जिल्हा परिषदेत शुक्रवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी विविध विभागातील कामांचा आढावा घेतला. त्या जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील ५ कोटींच्या वसुलीतील अफरातफरीबाबत अधिकार्‍यांना धारेवर धरले. ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठ्यासह इतर अफरातफरीची रक्कम त्वरित वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे.
 
 
जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कामे पूर्ण झालेली नाही. तसेच चाळीसगाव, जामनेर तालुक्यात घरकुलाचे सर्वाधिक कामे अपूर्ण असल्याने सदर कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. जिल्हाभरातील गटशिक्षणाधिकार्‍यांनीही कामाचे उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे त्यांनी सांगितले. दर महिन्यानंतर जिल्हा परिषदेतील या विविध विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर होणार्‍या बैठकीस संबंधित विभागाचे खातेप्रमुख उपस्थित राहत नाही. शिक्षण विभागावर कुठलेही नियंत्रण नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेतील संबंधित विभागांनी त्यांचे कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.