‘राजधानी’ने केला नाशिकचा सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2018
Total Views |

 

 

नाशिक : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८अंतर्गत देशात सर्वाधिक ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचा २ ऑक्टोबरला दिल्लीत होणार्‍या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. याच दिवशी मुंबईतील कार्यक्रमात पोषण आहार अभियानात प्रथम स्थान मिळविल्याबद्दल नाशिकचा सन्मान करण्यात येणार आहेपंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, दीनदयाळ कौशल्य विकास कार्यक्रम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यापाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यास स्वच्छ सर्वेक्षण व पोषण आहार अभियानात चांगले काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.

 
 
‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणातऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २0१८’मध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्ह्यात कुटुंब संपर्क अभियान राबवून घरोघरी भेटी देण्यात आल्या. तसेच सरकारने विकसित केलेल्या मोबाईल अॅप ‘एसएसजी २0१८’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा जिल्हा २ लाख, २१ हजार, ३२१ प्रतिक्रिया नोंदवून देशात पहिल्या क्रमांकावर आला. यामुळे या जिल्ह्याचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छता फेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम, स्वच्छतेचे फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्रांमधील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली. विविध ग्रामपंचायतींचे रंगरंगोटीने सुशोभिकरण करण्यात आले होते. याची दखल घेत ग्रामीण मूल्यांकनासाठी केंद्र सरकारकडून दि. १ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत गावांची तपासणी करण्यात आली होती.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@