शस्त्रास्त्रे पाहण्याची धुळेकरांना संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |

- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे



धुळे, दि. २६ :
सैन्य दलाच्या माध्यमातून धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या विविध मैदानांवर २९ व ३० सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित ‘आगे बढो’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून सैन्य दलातील विविध शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपलब्ध होत आहे. धुळेकर नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे.
 
 
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी म्हटले आहे, भारतीय सैन्य शांततेच्या काळात नागरी प्रशासनाला मदत करण्यात आघाडीवर राहिले आहे. नैसर्गिक आपत्तीत मदत व पुनर्वसनाच्या कार्यात सैन्य दलाचे जवान पुढे असतात. याबरोबरच विदेशातही आपला सहभाग नोंदविला आहे. एवढेच नव्हे, तर मित्र देशांबरोबर सांघिक कवायती केल्या आहेत.
 
 
साहस आणि वीरता या गोष्टी भारतीय सैनिकांच्या जीवनाच्या एक भाग झाल्या आहेत. या साहसाची नागरिकांना माहिती व्हावी, सर्वसामान्य नागरिक, तरुणांमध्ये देशभक्तीची भावना वृध्दिंगत व्हावी, देशभक्तीला चालना मिळावी तसेच भारतीय सैन्य दलाच्या कामकाजाची, कामगिरीची नागरिकांना माहिती व्हावी म्हणून भारतीय सैन्य दलातर्फे "Know Your ­army' अर्थात ‘आपल्या सैन्याविषयी जाणून घ्या’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३० सप्टेंबर २०१८ रोजी धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या विविध मैदानांवर ‘आगे बढो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलाच्या विविध विभागाच्या जवानांचे आपली शस्त्रास्त्रे आणि साहित्यासह आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
‘आगे बढो’ या प्रदर्शनात सहभागी सर्व जवान २९ सप्टेंबर २०१८ रोजी आपला अंतिम सराव करतील. विशेष म्हणजे हा अंतिम सराव पाहण्याचीही संधी धुळेकरांना उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनात सैन्य दलाची विविध उपकरणे त्यात शस्त्रास्त्रे, लढाऊ वाहने, बंदूक, रणगाडा, विविध सुविधांनी सज्ज असे अद्ययावत रडार आदींचा समावेश असेल. तसेच हेलिकॉप्टर, मोटारसायकलच्या माध्यमातून जवान विविध कसरती सादर करतील. याशिवाय अश्वदल, श्वानपथक, मार्शल आर्टच्या कसरती सादर केल्या जातील. तसेच ब्यूटी द रिट्रिट हा बॅण्ड पथकाचा विशेष कार्यक्रम होईल, असेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी नमूद केले.
 
 
या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारीही धुळे शहरात दाखल होणार आहेत. ३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून कार्यक्रमांना सुरुवात होईल. या दिवशी सकाळच्या सत्रात शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन त्यात रणगाडे, लढाऊ वाहने, बंदुका, रडार, बॉम्ब नष्ट करण्याचे साहित्य, सर्जिकल स्ट्राइक ऑपरेशनचा समावेश असेल. दुपारच्या सत्रात ३.३५ वाजता अद्ययावत हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर भारतीय राष्ट्रध्वजासह संचलन करतील. यावेळी कुकरी नृत्य जवान सादर करतील.
 
 
मराठा लाइट इन्फट्री आणि गोरखा सैन्याची माहिती देणार्‍या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाईल. उपस्थितीचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे
@@AUTHORINFO_V1@@