राहुल गांधींचा पाकिस्तानकडून प्रचार

    24-Sep-2018
Total Views |


 
 
भाजपचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
 

नवी दिल्ली : राफेल डीलवरुन टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केले आहेत. राहुल यांचा पाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर घणाघाती हल्ला चढवला. राहुलच भारताचे पुढील पंतप्रधान असतील असे ट्विट पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री रहमान मलिक यांनी केले होता. याचा पात्रा यांनी यावेळी संदर्भ दिला.

 

काय म्हणाले संबित पात्रा पहा...


रहमान मलिक यांचे नेमकं काय म्हणणं




 

मोदी राहुल गांधींना घाबरले आहेत. राहुलच भारताचे पुढील पंतप्रधान असतील, असे पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्यांनी केलेली टीका आणि पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केलेले समर्थन यावरुन हा योगायोग नसून एक षडयंत्र असल्याची घणाघाती टीका पात्रा यांनी केली.