विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम येथे नक्षलवाद्यांनी दोन टीडीपी आमदारांची हत्या केली. नक्षलवाद्यांनी अराकू खोऱ्यात ही घटना घडली असून त्यामुळे आंध्रप्रदेशात प्रचंड खळबळ उडाली आहे. किदारी सर्वेस्वरा राव आणि सिवेरी सोमा अशी आमदारांची नावे आहेत.
किदारी सर्वेस्वरा राव हे अराकूचे आमदार होते तर सिवेरी सोमा हे माजी आमदार होते. या घटनेत राव यांच्या पर्सनल असिस्टंचादेखील मृत्यु झाला आहे. नक्षलवाद्यांकडून ही हत्या झाल्याने आंध्रप्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.