इस्रोतर्फे नाशिकमध्ये कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |




नाशिक:तंत्रज्ञानाच्या मदतीने अंतराळ संशोधनात दिवसेंदिवस बदल होत आहेत. जीपीएससारख्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रिमोट उपग्रहांची माहिती आत्मसात करावी,” असे प्रतिपादन हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञ डॉ. राजश्री बोथाले यांनी केले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (एनआरएससी) आणि संदीप विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंतराळ संशोधन व परीक्षण’ याविषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. संदीप विद्यापीठाच्या स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या इमारतीमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. उपग्रह परीक्षण करण्याची योग्य पद्धत, त्यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळवण्याची पद्धत त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. उपग्रहांची काम करण्याची पद्धत, त्याचा कार्यकाळ याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. नागपूर येथील रिमोट सेंटरचे शास्त्रज्ञ मिलिंद वाडोडकर यांनी उपग्रहांच्या मदतीने तत्काळ माहिती मिळणे शक्य असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात रिमोट सेन्सर फायदेशीर ठरते, असे ते म्हणाले.

 

कृषिविभागाच्या सर्वांगीण विकासाठी एनआरएससीमार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘फसल’ या रिमोट सेन्सिंग उपग्रहाची माहिती वाडोडकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. ग्रामीण भागातील रिमोट सेन्सरच्या कार्यप्रणालीद्वारे शिक्षणाच्या प्रसाराची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. जीपीएस सुविधेच्या माध्यमातून उपग्रहासाठी सद्यस्थिती जाणून घेणे शक्य झाले आहे. अंतराळ संशोधनात जीपीएस सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अंतराळ संशोधनात काम करताना जीपीएस आणि रडार सिस्टिमच्या मदतीने फॉरेस्ट भागात कसे काम होते, याची माहिती इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. उदय राज यांनी दिली. कार्यशाळेत विविध कॉलेजच्या ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी व्यासपीठावर संदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. रामचंद्रन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे शास्त्रज्ञ, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रमुख अरुणकुमार द्विवेदी, खा. हेमंत गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@