पनामा प्रकरण : नवाझ शरीफ यांना जामीन मंजूर

    19-Sep-2018
Total Views |

 


 
 
 
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुलगी व जावई यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पनामागेट भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. नवाझ शरीफ यांना १० वर्षे, त्यांची मुलगी मरीयम हिला ७ वर्षे आणि जावई सफदर मोहम्मद याला २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षेला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पनामागेट भ्रष्टाचार प्रकरणी ६ जुलै रोजी निर्णय देत या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. आता मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी नवाझ शरीफ यांच्या विरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
 

काय आहे पनामा प्रकरण?

 

पनामा येथील एका लॉ फार्मची काही कागदरपत्रे लीक करण्यात आली होती. त्यामुळे जगभरातील श्रीमंत, राजकारणी, देशांचे प्रमुख आपला काळा पैसा कसा सुरक्षित ठेवून तो विदेशात पाठवतात हे उघडकीस आले होते. त्यात नवाझ शरीफ यांचे नाव असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात त्यांची मुलगी व जावई यांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/