
काय आहे ‘मोमो चॅलेंज’?
मोमो चॅलेंज या खेळाची सुरुवात सर्वप्रथम फेसबुकद्वारे झाली होती. आता व्हॉट्सअपद्वारे हा गेम पसरवला आहे. एका अनोळख्या व्हॉट्सअप नंबरवरून व लोकांशी संपर्क साधला जातो. या गेममध्येही ब्ल्यू व्हेल गेम प्रमाणेच खेळणाऱ्या व्यक्तीला टास्क दिले जातात. हे टास्क हिंसक असतात. शेवटच्या टास्कमध्ये खेळणाऱ्याला आत्महत्या करायला सांगतिले जाते. हे टास्क जर केले नाहीत तर तुमचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले जाईल. अशी धमकी या गेममधून दिली जाते. लहान मुलांना या गेमद्वारे लक्ष्य केले जात आहे. आपली मुले मोमो चॅलेंज हा गेम तर खेळत नाहीत ना याची पालकांनी दक्षता घ्यायला हवी. असे महिला व बालविकास कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
कसा कराल ‘मोमो’पासून बचाव?
> अनोळख्या नंबरवरून आलेली लिंक ओपन करू नका.
पालकांसाठी सूचना
> आपली मुले मोबाईलवर मोमो चॅलेंज हा गेम खेळत तर नाहीत ना याची खात्री करून घ्या. त्यांना या गेमबाबत सावध करा.
> मुलांशी नियमितपणे संवाद साधा. त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करा.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/