हैद्राबाद: तेलंगणा राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील कोंडागट्टू घाटात राज्य परिवहन निगमची बस उलटली. या बसमध्ये प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत बाकीचे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांना बातमी मिळताच ताईने तिथे बचावकार्याला सुरुवात केली आहे.
जगतीयालच्या पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारांसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून बचावकार्य सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अपघातांवर शोक व्यक्त केला आहे. सरकारने अपघातात मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/