‘बिनपाण्याच्या आंघोळीच्या शॅम्पू’ची कथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018   
Total Views |



 
 
डॉ. पुनीत गुप्ता यांनी दुर्गम भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करी जवानांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी ‘बिनपाण्याच्या आंघोळीच्या शॅम्पू’ची निर्मिती केली आहे. त्याविषयी...
 
 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

आंघोळीच्या गोळीचे कितीतरी किस्से आपण सर्वांनी ऐकले, वाचले असतील. मराठी साहित्यात, कथा-कादंबऱ्यांत, विनोदी लेखनातही ‘आंघोळीच्या गोळी’चा उल्लेख बऱ्याचदा आला. आता मात्र ‘आंघोळीची गोळी’ नाही म्हटले तरी ‘बिनपाण्याचा आंघोळीचा शॅम्पू’ उपलब्ध होत आहे. ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ हा स्टार्टअप सुरू करणाऱ्या डॉ. पुनीत गुप्ता यांनी दुर्गम भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करी जवानांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी या बिनपाण्याच्या आंघोळीच्या शॅम्पूची आणि वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित अन्य उत्पादनांची निर्मिती केली आहे. यासाठी त्यांच्या कंपनीला पाच लाख डॉलर्सची आर्थिक मदतही मिळाली असून ‘मेक इन इंडिया’ अभियानापासून प्रेरणा घेत ते अशी उत्पादने तयार करत आहेत.

 

दिल्लीत जन्मलेल्या पुनीत गुप्ता यांनी कोलकाता आयआयएममध्ये २०११ साली एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी चार वर्षांपर्यंत युनायटेड किंग्डममध्ये शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी ‘डीआरडीओ’ आणि ‘हनीवेल’ कंपनीमध्येही काम केले. पुढे शिक्षण झाल्यावर २०१६ साली त्यांनी आपल्या मित्रांच्या साथीने ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला दिल्ली आयआयटीत ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ने आपली पाणी बचत करणारी उत्पादने उपलब्ध करून दिली आणि आता तर त्यांनी ही उत्पादने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत (नासा) पोहोचवण्याचेही ठरवले आहेक्लेन्स्टा इंटरनॅशनलचे संस्थापक पुनीत गुप्ता यांची कंपनी एक अभिनव कल्पना पुढे घेऊन जाणारी बायोटेक स्टार्ट-अप आहे. कंपनीची उत्पादने ‘बिनापाण्याची आंघोळ’ या अद्भुत संकल्पनेवर आधारित आहे. विशेषत्वाने सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या वैयक्तिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी ते ही सुविधा उपलब्ध करून देत आहेत. शिवाय ही उत्पादने वापरण्याची पद्धतही सोपी आहे. त्वचेशी संबंधित आजारांपासूनही ही उत्पादने संरक्षण करतात. पण याची सुरुवात कशी झाली? तर एका बाजूला पाणी बचत करणाऱ्या उत्पादनांची निर्मिती सुरू असतानाच पुनीत गुप्ता यांना लष्करातील जवानांसाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. जवानांच्या वैयक्तिक अडीअडचणींशी निकटचा परिचय झाल्यानंतर त्यांना आपल्या कंपनीच्या माध्यमातून जवानांच्या अडचणींवर मात करणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली व त्यांनी तशी उत्पादने तयारही केली.

 

‘क्लेन्स्टा’ने एका वर्षापूर्वी भारत सरकार आणि कारगील, सियाचीन, द्रास यासारख्या दुर्गम भागात तैनात असलेल्या जवानांसाठी आपल्या उत्पादनांचा पुरवठा सुरू केला. आता ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ ही कंपनी ‘बिनपाण्याचा शॅम्पू’ आणि ‘बॉडी बाथ’ तयार करत आहे. ‘क्लेन्स्टा’चा ‘शॅम्पू’ आणि ‘बॉडी बाथ’ लावल्यानंतर स्वच्छ टॉवलने अंग पुसावे लागेल, ज्यात पाणी वापरण्याची गरजच राहणार नाही. ‘क्लेन्स्टा’ने तयार केलेल्या १० मि.ली शॅम्पूच्या बाटलीमुळे ३०० लीटर पाण्याची बचत होते, हीदेखील उल्लेखनीय गोष्ट. पुनीत गुप्ता यांनी अशाप्रकारची उत्पादने तयार करण्याबाबत सांगितले की, आमची उत्पादने जिथे क्वचितच पाणी उपलब्ध होते अथवा होतच नाही, अशा परिस्थितीत आयुष्य जगावे लागणाऱ्या लोकांसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार केलेली आहेत. क्लेन्स्टाच्या उत्पादनांचा वापर करून बिनपाण्याची आंघोळ करणाऱ्या, दुर्गम भागात राहणाऱ्या जवान आणि रुग्णालयात दाखल केलेल्या आजारी व्यक्तींना, त्यांची काळजी घेणाऱ्यांना आणि व्यस्त जीवन जगणाऱ्या लोकांना प्रसन्नतेची अनुभूती तर देत आहेतच पण त्यांच्यासाठी वरदानही ठरत आहेतक्लेन्स्टाच्या उत्पादनांचे महत्त्व जे जवान कारगील, सियाचीनसारख्या हिमनगांनी वेढलेल्या भागात उणे ४५ अंश सेल्सिअस तापमानात आयुष्य जगतात ते नक्कीच समजू शकतील. पुनीत यांचे याबाबत म्हणणे आहे की, आपल्या संरक्षण-सुरक्षा तयारीची गोष्ट येते, तेव्हा लष्कराच्या आरोग्याशी संबंधित बाबींना प्राधान्य असले पाहिजे.

 

दरम्यान, फक्त ‘बिनपाण्याचा आंघोळीचा शॅम्पू’ आणि ‘बॉडी बाथ’ एवढ्यावरच आपली उत्पादने सीमित करण्याची पुनीत यांची इच्छा नाही. आता ते ‘बिनपाण्याची टूथपेस्ट’ आणि ‘बिनपाण्याचा फेसवॉश’ तयार करण्याचादेखील विचार आणि संशोधन करत आहेत. सध्यातरी संबंधित भागात त्वचेची मृदुता राखण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी त्यांच्या उत्पादनांचे नाव सर्वत्र घेतले जात आहे. सध्यातरी ‘क्लेन्स्टा इंटरनॅशनल’ आपल्या उत्पादनांच्या प्रचार-प्रसारासाठी गोळ्या-औषधांचे वितरण करणाऱ्यांच्या संपर्कात असून त्याद्वारेच लोकांपर्यत पोहोचत आहे. ‘क्लेन्स्टा’ची उत्पादने तयार करण्याकामी भारत आणि अमेरिकन अन्न-औषध व्यवस्थापनाच्या दिशानिर्देशांचे पालन केले जाते. त्याचबरोबर उत्पादनांच्या संशोधनाकामी दिल्ली आयआयटीचेही सहकार्य घेतले जाते. आयआयटी आणि आयआयएमचे माजी विद्यार्थी कंपनीच्या सल्लागार मंडळात आहेत. डॉ. पुनीत गुप्ता यांच्या कोअर टीममध्ये भारतातील प्रतिष्ठित संस्था जसे की, कोलकाता आयआयएम, एफसीएस, दिल्ली आयआयटी आदींत शिकलेले पात्र माजी विद्यार्थी आहेत. ‘क्लेन्स्टा’च्या उत्पादनांवरुन आणि डॉ. पुनीत गुप्ता यांच्या कल्पकतेतून नेहमी नेहमी ‘आंघोळीच्या गोळी’चा ऐकलेला उल्लेख तर आठवतोच आणि तो ‘बिनपाण्याच्या आंघोळीच्या शॅम्पू’च्या रूपाने प्रत्यक्षात उतरल्याचेही पाहायला मिळते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@