पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |


 


मुंबई : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य व कला पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा विखे पाटील यांची ११८ वी जयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधुन देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पत्रकार, लेखक पुरस्कार अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना जाहीर करण्यात आला तर साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांना देण्यात येणार आहे.

 

ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक माजी प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे व्यक्तिमत्व व लेखन संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे आणि सामाजिक जाणीव असलेले आहे. त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव व्हावा म्हणुन यावर्षीचा साहित्यसेवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला असून एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे. पत्रकार, लेखक पुरस्कार प्राप्त अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील हे अहमदनगर येथे गेली ३ दशकं पत्रकारी क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध सामाजिक कामात व क्षेत्रात ते नेहमी अग्रेसर असतात. या कालखंडात त्यांनी विविध पुस्तकाचे लेखन केले असून कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे , चिमटे आणि गुदगुल्या, ढोल आणि तुणतुणे, पक्ष आणि निष्पक्ष, गुद्दे आणि मुद्दे, समाजभान, कारभारणी, वारसदार, कारभारी या पुस्तकाचे ते लेखक असून त्यांच्या ‘कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे’ या पुस्तकास हा पुरस्कार देण्याचे निवड समितीने जाहीर केले आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिम्मित दरवर्षी २५ ऑगस्ट रोजी हे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्काराचे यंदाचे हे २८ वे वर्ष असून प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात दुपारी २ वाजता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. रावसाहेब कसबे यांनी काम पहिले.

 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार प्राप्त व्यक्ती

 

साहित्य जीवनगौरव पुरस्कार - रा. रं. बोराडे

 

पत्रकार, लेखक पुरस्कार अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील

 

राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार - श्री. बाबाराव मुसळे

 

अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार - हेरंब कुलकर्णी

 

विशेष साहित्य पुरस्कार - महेश लोंढे

 

नाट्यसेवा पुरस्कार - दत्ता पाटील

 

समाज प्रबोधन पुरस्कार - ह.भ.प शामसुंदर महाराज सोन्नर

 

कलागौरव पुरस्कार - अभिनेते मिलींद शिंदे

@@AUTHORINFO_V1@@