राज्याची वाटचाल विकासाच्या दिशेने : गिरीश महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2018
Total Views |


 

 रस्ते, सिंचन सुविधांची कामे प्रगतिपथावर
 

नाशिक : ‘‘रस्ते विकास आणि सिंचन सुविधांच्या माध्यमातून राज्याची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. येत्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे राज्यात करण्यात येणार आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते आदी उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले की, ‘‘राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या विकासासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ४० हजार कोटी मंजूर केले आहेत. तसेच, बळीराजा सिंचन योजनेअंतर्गत नुकतेच १३ हजार ६५१ कोटींच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारदेखील टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देणार आहे. यामुळे राज्यातील सिंचनव्यवस्थेचे चित्र बदलणार आहे.”

 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्याला सिंचन विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘राज्यात विविध ठिकाणी रस्ते विकासाच्या कामांनादेखील केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था गतिमान होऊन त्याचा विकासावर चांगला परिणाम होईल,” असे त्यांनी सांगितले. ‘‘जिल्ह्यात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून ग्रामीण भागात कुणीही उघड्यावर शौचास जाणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी व्यक्तिश: प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले. ‘‘शौचालय बांधण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@