यादवांच्या समाजवादी पक्षातील यादवी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
मुलायमिंसह यादव यांच्या समाजवादी पक्षात पुन्हा यादवीची स्थिती निर्माण झाली आहे. मुलायमिंसह यादव यांचे बंधू शिवपालिंसह यादव यांनी, ‘समाजवादी सेक्युलर मोर्चा’ नावाच्या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षात शिवपालिंसह यादव यांची उपेक्षा सुरू होती. त्या पक्षात त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. तेव्हापासून शिवपालिंसह यादव अस्वस्थ होते. दुसर्या पक्षात जायचे की नवा पक्ष स्थापन करायचा, यावर त्यांचे मंथन सुरू होते.
 
 
शिवपालिंसह यादव यांनी भाजपात जाण्याची तयारी केली होती, असा दावा मुलायमिंसह यादव यांचे एकेकाळचे उजवे हात अमरिंसह यांनी केला आहे. शिवपालिंसह यादव यांच्या भाजपाप्रवेशासंदर्भात त्यांची एका ज्येष्ठ भाजपा नेत्याशी मी भेटही ठरवून दिली होती, पण त्या वेळी यादव आलेच नाहीत, त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेश बारगळला, असे अमरिंसह यांनी स्पष्ट केले. कोणत्याही दुसर्या पक्षात न जाता शेवटी शिवपालिंसह यादव यांनी आपला नवा पक्ष काढला. शिवपालिंसह यादव यांच्या नव्या पक्षाला मुलायमिंसह यादव यांचा आशीर्वाद आहे काय, हा प्रश्न आहे. आपल्या नव्या पक्षाची स्थापना करण्यापूर्वी शिवपालिंसह यादव यांनी मुलायमिंसह यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली होती. त्यामुळे मुलायमिंसह यादव यांचा नव्या पक्षाला आशीर्वाद असला पाहिजे.
 
शिवपालिंसह यादव यांचे राजकीय अस्तित्वच पूर्णपणे मुलायमिंसह यादव यांच्यावर अवलंबून आहे. मुलायमिंसह यादव यांचीही अखिलेश यादव यांच्या नेतृृत्वातील समाजवादी पक्षात गेल्या काही महिन्यांपासून कोंडी होत होती. मध्यंतरी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही मुलायिंसह यादव यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. सुरुवातीला अखिलेश यादव आणि मुलायमिंसह यादव यांच्यातील तथाकथित मतभेद आणि भांडणे ही मिलीजुलीची लढाई असल्याचे मानले जात होते. मात्र, त्यानंतरचा घटनाक्रम वेगळाच आहे.
 
 
 
मुलायमिंसह यादव यांची गत नखं काढलेल्या वाघासारखी झाली आहे. पक्षातील त्यांचे स्थान आणि महत्त्व संपल्यात जमा आहे. पक्षावर पूर्णपणे अखिलेश यादव यांनी कब्जा केला आहे. त्यामुळेच, पक्षात मला कोणी विचारत नाही, माझा मानसन्मान करत नाही, कदाचित माझ्या मृत्यूनंतरच माझा ते मानसन्मान करतील, अशी वेदना मुलायमिंसह यादव यांनी नुकतीच व्यक्त केली होती. मुलायिंसह यादव यांनी कोणाचे नाव घेतली नसले, तरी त्यांचा रोख अखिलेश यादव यांच्याकडे होता. याचा अर्थ, मुलायमिंसह आणि अखिलेश यादव यांच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत, असा काढता येऊ शकतो. मुलायमिंसह यांनी आपला लहान भाऊ शिवपालिंसह यादव याला डावलत अखिलेश यादवला आपला राजकीय वारसदार घोषित केले होते. मात्र, त्याच अखिलेश यादव यांनी मुलायिंसह यादव यांना त्यांची जागा दाखवून दिली!
 
 
काही वर्षांपूर्वी मैनपुरी येथे एका मेळाव्यात बोलताना मुलायमिंसह यादव यांनी, आता जितका अपमान झाला, तेवढा अपमान याआधी कधीच झाला नाही, आणि हा अपमान बाहेरच्यांनी नाही तर घरच्याच लोकांनी केला! या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘‘जो अपने बाप का नही हुआ, वो औरो का क्या होगा?’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्नौज येथील आपल्या सभेत म्हटले होते. म्हणजे अखिलेश यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी जेवढे ओळखले तेवढे दुसरे कोणीच ओळखले नाही.
 
 
शिवपालिंसह यादव यांच्या नव्या पक्षाचा राजकीय प्रवास कसा राहील, समाजवादी पक्षातील किती नेते त्यांना साथ देतील, हे सांगणे कठीण आहे. मुलायमिंसह यादव यांचा नव्या पक्षाला आशीर्वाद असला, तरी ते खुलेआम शिवपालिंसह यादव यांना मदत करतील काय, यासारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
 
समाजवादी पक्षाच्या आजच्या स्थितीसाठी मुलायमिंसह यादवही जबाबदार आहेत. मुलगा अखिलेश यादव आणि लहान भाऊ शिवपाल यादव यांचा कान पकडून त्यांना योग्य वेळी चूप बसवणे मुलायमिंसह यादव यांना कठीण नव्हते. त्यांनी एकाच वेळी दोघांचे कान पकडायला हवे होते. पण, मुलायमिंसह यादव यांनी कधी अखिलेशचा कान पकडला, तर कधी शिवपाल यादव यांचा. त्यामुळे यातून जो योग्य संदेश जायला हवा होता, तो गेला नाही. मुलायमिंसह यादव यांनी ज्या वेळी अखिलेश यादव यांचा कान पकडला, त्या वेळी आपण जिंकलो, असे शिवपाल यादव यांना वाटत होते आणि ज्या वेळी मुलायमिंसह यादव यांनी शिवपाल यादवचा कान पकडला, त्या वेळी आपण जिंकलो, असे अखिलेश यादव यांना वाटत होते.
 
 
 
समाजवादी पार्टीतील या यादवीत नेमकी कुणाची बाजू घ्यायची, याचा निर्णयच मुलायमिंसह यादव यांना घेता आला नाही. त्यामुळे ते कधी आपल्या मुलाची म्हणजे अखिलेश यादव यांची बाजू घ्यायचे, तर कधी आपल्या भावाची शिवपाल यादव यांची. याबाबतीत त्यांना नात्यांचे संतुलन साधता आले नाही. यातून समाजवादी पक्षाची आजची स्थिती झाली आहे. मुलायमिंसह यादव यांनी या काळात ज्या परस्परविरोधी भूमिका घेतल्या, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचाही विश्वास उडाला. अखिलेश यादव यांनी कॉंग्रेससोबत केलेल्या आघाडीचा आदल्या दिवशी विरोध करायचा, दुसर्या दिवशी आघाडीच्या बाजूने बोलायचे. अखिलेशवर कधी जोरदार टीका करायची, तर दुसर्याच दिवशी त्याचे कौतुकही करायचे. त्यामुळे मुलायमिंसह यादव नेमके कुणाच्या बाजूने आहेत, अखिलेश यादव की शिवपाल यादव, हे राज्यातील जनतेला आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनाही समजले नाही.
 
बसपाच्या पाठिंब्याने गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांच्या मस्तकात शिरली. आपल्या लोकप्रियतेनेच आपल्याला हा विजय मिळाल्याचा त्यांचा समज झाला. राज्यात भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे सपाला या दोन्ही पोटनिवडणुकीत विजय मिळाला. यात अखिलेश यादव यांचे कोणतेही राजकीय कर्तृत्व नाही. अर्ध्या हळकुंडात पिवळे झाल्यासारखी अखिलेश यादव यांची स्थिती झाली आहे. त्यामुळे राजकारणाची बाराखडी शिकवलेल्या आपल्या वडिलांनाच त्यांनी पक्षातून बाजूला केले आहे. अखिलेश यादव यांच्या राजकारणामुळे मुघल काळातील राजकारणाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही! मुघल काळात सत्तेसाठी बापला तुरुंगात टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत. अखिलेश यादव यांनी मुलायमिंसह यांना तुरुंगात टाकले नसले, तरी राजकीयदृष्ट्या विजनवासात निश्चित टाकले आहे.
 
उद्या जर राज्यात, सध्या चर्चा असलेली सपा आणि बसपा यांची आघाडी झाली नाही, तर अखिलेश यादव यांची स्थिती आजच्यापेक्षाही खराब झाल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सपा आणि बसपा यांची आघाडी होण्याची सध्यातरी कोणतीच शक्यता दिसत नाही. त्यामुळे अखिलेश यादव यांनी उड्या मारण्याचे कारण नाही. घराणेशाहीतून मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाचा कोणताच फायदा अखिलेश यादव यांना राज्याला करून देता आला नाही. मुख्यमंत्री म्हणून आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळेच अनेक जवळचे सहकारी त्यांना सोडून चालले आहेत.
मुलायमिंसह यादव यांनी आतापर्यंत जे पेरले त्याचेच हे फळ आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांचे तुष्टीकरण करणार्या मुलायमिंसह यादव यांना आतातरी आपली राजकीय चूक कळेल, अशी आशा करायला हरकत नाही. अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीला आपल्या सत्ताकाळात जेवढा विरोध मुलायमिंसह यादव यांनी केला, तेवढा एखाद्या कट्टर मुस्लिमानेही केला नसेल! त्याचीच किंमत आता मुलायमिंसह यादव यांना चुकवावी लागत आहे. मानसन्मानाची भीक मागत फिरावे लागत आहे. काळाने उगवलेला हा त्यांच्यावरचा सूडच म्हटला पाहिजे!
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@