गाडेगाव जवळ अपघात 7 जण जखमी

    03-Aug-2018
Total Views | 23
 
 
गाडेगाव जवळ अपघात 7 जण जखमी
 
जळगाव, 3 ऑगस्ट
जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे भरधाव चारचाकीने शालेय विद्याथ्र्यांसह दुचाकीस्वारास धडक दिल्याने 7 जण जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
 
गाडेगाव येथे शुक्रवाररोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बसमध्ये चढत होते. तेवढयात कच्च्या रस्त्यावरुन चारचाकी सुसाट आली. या चारचाकीने पुजा पवार वय 14, प्रतिज्ञा मोरे (13), बोरोले (13), अश्विन मोरे (14), राज खरे (14), कोमल ब-हाटे(14) आणि दुचाकी चालक किशोर प्रल्हाद पाटील (43) हे जखमी झाले. चारचाकी चालकाने अपघात करुन धूम ठोकली परंतु युवकांनी त्याचा पाठलाग करुन नेरी जवळ त्यास पकडुन धुलाई केली. पोलीसांनी नेरी जवळून गाडी ताब्यात घेतली आहे. दरम्यान किशोर पाटील व एका विद्यार्थीनीला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना मुंबईल हलवण्यात आले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121