रामभाऊ म्हाळगी येथे ओबीसी मोर्चा आढावा बैठक उत्सहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2018
Total Views |

 
 
रामभाऊ म्हाळगी येथे ओबीसी मोर्चा आढावा  बैठक उत्सहात 
 
कोल्हापूर, २९ ऑगस्ट
केंद्रा मध्ये नरेंद्र मोदी आणि राज्या मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विकासपर्व सुरू केले आहे. म्हणून काही विघ्नसंतोषी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन भा.ज. पा. ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.
 
येथील भारतीय जनता पार्टीच्या रामभाऊ म्हाळगी सभागृहात शहर व जिल्हा पदाधिका-यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी  यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई, ओबीसी मोर्चाचे महामंत्री अजय भोळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संदीप कुंभार, ओबीसी मोर्चाचे ग्रामीण अध्यक्ष श्रीपतराव यादव, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विद्या बनसोडे आदि पदाधिकारी उपस्थित होते. कार्याक्रमापूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पण करुन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
      यावेळी  चौधरी पदधिका-यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विदर्भ व मराठवाडयाचा प्रवास संपवून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या ' संवाद से संपर्क '  या अभियानाचा दुसरा टप्पा पुणे येथुन सुरु झाला आहे. या दरम्यान पुणे, सातारा, कराड येथे पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.  चौधरी म्हणाले की, ओबीसीचे वाढते संघटन हे भाजपा च्या दृष्टीने जमेची बाजू आहे. मात्र पदाधिकार-यांना इतपर्यंत समाधानमानून आपल्याला चालणार नाही. ओबीसी मोर्चाला बुथ स्तरापर्यंत घेउन जावे लागणार आहे.  ओबीसी समाज गेल्या 40 वर्षापासून आपल्या संविधानिक हक्कांपासून उपेक्षित होता. वेळोवेळी कॉंग्रेसच्या पक्षपाती धोरणामुळे मागे रहावे लागले, मात्र भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने या महिन्यात ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देउन आपल्या समाजाला संविधानिक अधिकार दिला याचा मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे.
 
विरोधकांचा घेतला समाचार  
 चौधरी यांनी  विरोधकांचा समाचार घेत भाजपा ची भूमिका स्पष्ट आहे. सबका साथ, सबका विकास आपला हा उद्देश पूर्ण करण्यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे, मात्र काही लोकांना हा विकास बघवत नाही, म्हणून याना त्या मार्गाने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. मात्र याचा कोणताही परिणाम होऊ न देता मुख्यमंत्री फडणवीस आणखी जोमाने काम करीत आहे. दुर्दैवाने यात सतेत वाटेकरी असलेली शिवसेना देखील सामील आहे. त्या मुळे सर्वांनी सतर्क राहून जनहीताची कामे करावी अशी सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली.
कार्यक्रम प्रसंगी प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी पदाधिका-यांना ओबीसी समाजातील 348 जाती पैकी आपल्या शहरात असलेल्या जातींच्या अंतर्गत संघटनांच्या नेतृत्वापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्याचे निर्देश दिले.  या वेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष  देसाई , ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री  भोळे यांनी आपले विचार व्यक्त केले व पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीच्या दरम्यान, केंद्र सरकारने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगी जिल्हयातील मंडल अध्यक्ष, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@