
तसेच एस.टी. वर्कशॉप, वर्तकनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर मानपाडा सिग्नल, वसंत विहार, पातलीपाडा, तीन हातनाका परिसर, वंदना सिनेमा आदी सर्व ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी ठाणे वाहतूक पोलिसांशी चर्चा करुन रस्त्याची कामे सुरू असताना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांना असलेल्या समस्या जाणून घेवून त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबतही प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याचे महापौर मिनाक्षी शिंदे यांनी यावेळी नमूद केले. संपूर्ण ठाणे शहरातील रस्त्यांची दुरूस्तीची कामे युध्दपातळीवर सुरू असून २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेपूवी संपूर्ण रस्ते पूर्ववत करण्यात यावे किंबहुना गणेशोत्वापूर्वी ठाणेकरांना सुस्थितीतील रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी आवश्यक ते आधुनिक तंत्रज्ञान वापरुन कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले. रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी सर्व पदाधिकारी हे स्वतः उभे राहून कामाचा आढावा घेत असल्याचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.