भा.ज.पा. ओ.बी.सी.मोर्चासंवाद से संपर्क अभियानास पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फुर्त प्रतिसाद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018
Total Views |
 
 
 

भा.ज.पा. ओ.बी.सी.मोर्चा
संवाद से  संपर्क अभियानास पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फुर्त प्रतिसाद !
 

नंदुरबार , २८ ऑगस्ट 

भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात ' संवाद से संपर्क ' अभियान राबविण्यात येत आहे. विदर्भापासून या अभियानाची सुरुवात होवून त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
 
या अभियानामुळे हजारोंच्या संख्येने ओ.बी.सी. बांधव एकत्रीत आले. विजयभाऊंच्या हस्ते अनेक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भा.ज.पा. प्रवेश घेतला . संवाद से संपर्क अभियानाची यशस्वी वाटचाल पश्चिम महाराष्ट्रात सुरु झाली आहे.

27 रोजी पुणे येथे पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक श्री.विजयभाऊ चौधरी, पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक मंत्री रवी अनासपूरे, भा.ज.पा. पुणे शहर जिल्हाध्यक्ष योगेश गोगावले, भा.ज.पा. ओ.बी.सी.मोर्चा महामंत्री अजय भोळे, भा.ज.पा.ओ.बी.सी.मोर्चा उपाध्यक्ष विकास रासकर, ठाणे विभागीय अध्यक्ष हरिशचंद्र भोईर, भा.ज.पा.ओ.बी.सी मोर्चा पुणे महानगर अध्यक्ष अशोक मुंढे, पुणे ग्रामिण जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार, पिंपरी चिंचवड अध्यक्ष रमेश भुजबळ आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली अर्पीत करण्यात आली.

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी मार्गदर्शन करतांना अनेक दशकांपासून ओ.बी.सी . समाज सर्वांगिण विकासापासून वंचीत आहे. ओ.बी.सी. आयोगाची अनेक वर्षांची मागणी केंद्रातील भा.ज.पा.च्या मोदी सरकारने मार्गी लावली आहे. त्यामुळे ओ.बी.सी. समाजाच्या विकासाला गती लाभणार आहे. केंंद्र व राज्य सरकारने चांगले काम केले असून त्यांच्या योजना सामान्य नागरिकांपर्यत पोहचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. सामान्यजनांना योजनांची माहिती देवून प्रसंगी त्यांना सहाय्य करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
 
@@AUTHORINFO_V1@@