शहरांचा विकासमंत्र आणि जागतिक क्रमवारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2018   
Total Views |


 

 

नुकताच भारतातील राहण्यायोग्य शहरांचा केंद्र सरकारचा अहवाल प्रसिद्ध झाला व त्यात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहराने बाजी मारली. त्यानिमित्ताने विविध शहरांचे विकासमंत्र आणि त्यांची क्रमवारी...

 

भारतातील शहरांची वास्तव्याकरिता, लोकसंख्येकरिता, सुरक्षिततेकरिता, खर्चाकरिता, व्यापाराकरिता इत्यादीसाठी सर्वेक्षणामधून एक क्रमवारी नुकतीच केंद्र सरकारतर्फे ठरविण्यात आली. त्याचा सविस्तर आढावा घेऊया.

 

वास्तव्याकरिता

 

अस्ताव्यस्त वाढणाऱ्या शहरांमध्ये राहणे दिवसेंदिवस कठीण होत असले, तरी देशातील 10 शहरांमध्ये मात्र सुविधांच्या दृष्टीने राहण्याच्या बाबतीत (Ease of Living) शक्य आहे. त्यांच्या दर्जाची क्रमवारी या वर्षीच्या 111 शहरांच्या सर्वेक्षणात नक्की झाली आहे. त्यातील 99 शहरांचा स्मार्ट शहरेम्हणून समावेश झाला आहे. त्यातील पहिल्या 10 शहरांची दर्जानुसार क्रमवारी खालीलप्रमाणे आहे. हे सर्वेक्षण सामाजिक स्थिती, संस्था कशा व किती, आर्थिक व भौतिकतेच्या सुविधा अशा चार मुद्यांवर आधारित आहे.

1. पुणे : हे शहर लोकवस्त्या, आरोग्य, वैद्यकीय उपचारांचा दर्जा, गृहबांधणी, आर्थिक व्यवहार व पर्यावरणाच्या दृष्टीने अव्वल ठरले.
 
 
2. नवी मुंबई : हे शहर नियोजनयुक्त असून त्याची व्याप्तीही तशी मोठी आहे. या शहराची बांधणी 1971 पासून सुरू आहे. मुंबईतील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने हे शहर आकारास आले. शहर नियोजनात प्रसिद्ध शहर नियोजन तज्ज्ञ चार्ल्स कोरिया, शिरीष पटेल व प्रविणा मेहता यांचा मोठा यामध्ये सहभाग होता.
 
 
3. बृहन्मुंबई : हे शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. वास्तव्य योग्य जागा, आरोग्य व वैद्यकीय उपचार-सुविधा आदी या शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शहरात वाहतुकीसाठी रेल्वे, मेट्रो व बसची सुविधाही उपलब्ध आहे. हे शहर व्यापारदृष्ट्या महत्त्वाचे समजतात. पण परवडण्यासारखे घर मिळणे, सांस्कृतिक, पर्यावरणीय व सुरक्षितता इत्यादी मुद्द्यांमध्ये शहराची उणीव जाणवते.
 
 
3. तिरुपती : आंध्र प्रदेशातील हे सुमारे चार लाख वस्तीचे शहर तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिराकरिता प्रसिद्ध आहे. या शहराला आंध्र प्रदेशाची ‘आध्यात्मिक राजधानी’ मानतात. येथे विद्यादान करणाऱ्या अनेक संस्था व विद्यापीठं आहेत. या शहराला ‘उत्तम शहर’ म्हणून वारसा स्थळाचा किताबही मिळाला आहे.
 
 
5. चंदीगढ : या शहराची प्रतिव्यक्ती वाहनांची संख्या देशात सर्वाधिक समजली जाते. त्याचबरोबर शहरातील रस्ते, वाहनतळे यांची चांगली देखभाल ठेवलेली आहेत.
 
 
6. ठाणे : या शहराची लोकसंख्या सुमारे 19 लाख आहे व शहराचे क्षेत्रफळ 147 चौ. किलोमीटर आहे. हे शहर मुंबई शहराजवळ असल्याने शहरातील सर्व सुविधांचे नियोजन केलेले आहे.
 
7. रायपूर : हे छत्तीसगढ राज्यातील मोठे व राजधानीचे व सर्व सुविधायुक्त शहर आहे. 1 नोव्हेंबर, 2000 साली प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे म्हणून मध्य प्रदेशपासून छत्तीसगढ हे वेगळे राज्य अस्तित्वात आले.
 
8. इंदूर : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे शहर पंधराव्या-सोळाव्या शतकात वाढले. हे शहर विद्येचे माहेरघर असून येथे आयआयटी व आयआयएम संस्था आहेत. येथील लोकवस्ती दोन लाखांहून अधिक व क्षेत्र 530 चौ. किमी आहे. मराठा पेशवा पहिला बाजीराव याने हा प्रदेश जिंकून मराठा साम्राज्याला जोडला. त्यानंतर होळकर घराण्याने त्याचा सांभाळ केला. हे शहर 2017 व 2018च्या सर्वेक्षणात ‘स्वच्छ शहर’ म्हणून गणले गेले. त्याचबरोबर हे शहर संगीतकला व खाद्यवैशिष्ट्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
 
 
9. विजयवाडा : हे शहर कृष्णा नदीच्या काठी वसलेले व आंध्र प्रदेशाची राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे प्रख्यात स्वयंभू कनक दुर्गादेवीचे मंदिर आहे. हे शहर भविष्यातील आंतरराष्ट्रीय शहर बनविण्याचे नियोजन सुरू आहे.
 
 
10. भोपाळ : हे शहर मध्य प्रदेश राज्याचे राजधानीचे शहर आहे. या शहराची ख्याती म्हणजे त्याला ‘सरोवरांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत व या शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमीही लाभली आहे. युनियन कार्बाईड कंपनीच्या गॅसगळतीतून 1984 मध्ये मोठा हाहाकार घडून अनेकजण मृत्यू पावले होते. पण, आज राज्यातील मोठे शहर असल्याने येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
 
 

राहणीमानाच्या दर्जावरून क्रमवारी

 

राजकीय व सामाजिक वातावरण, आर्थिक संपन्नता, वीजेची व पाण्याची उपलब्धता, आरोग्य व वैद्यकीय उपचार, शिक्षण, वाहतुकीची साधने, जीवनावश्यक वस्तू मिळणे इत्यादी मुद्दे 2017 सालाच्या सर्वेक्षणात विचारात घेतले गेले. जगभरातील 230 शहरांचे 18 वे जीवनदर्जाचे सर्वेक्षण घेतले गेले. त्यात व्हिएतनाम सर्वात उत्तम व बगदाद सर्वात खराब शहर आढळले. पहिल्या काही 30 शहरांत झुरिक, ऑकलंड, म्युनिच, व्हॅनकुव्हर, लंडन, पॅरिस व न्यूयॉर्क इत्यादींचा समावेश आहे. बीजिंग (118) श्रीलंका (132) असे क्रमांक आहेत.

 

स्त्री-पुरुष आर्थिक समानता

 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या 2017 मधील अहवालाप्रमाणे देशांच्या क्रमवारीत भारत 108व्या स्थानी आढळला. या बाबतीत क्रमवारीत पहिले 10 देश असे -आईसलँड, नॉर्वे, फिनलंड, रवांदा, स्वीडन, निकार्गुआ, स्लोव्हेनिया, आयर्लंड, न्यूझीलंड, फिलीपाईन्स

 

शेवटचे 135 ते 144 क्रमवारीतील 10 देश

 

येमेन, पाकिस्तान, सीरिया, चाड, इराण, माली, सौदी अरेबिया, लेबनॉन, मोरोक्को, जॉर्डन

 

सुखकारक देशांची क्रमवारी

 

एकूण 156 देशांच्या 2018 मधील सर्वेक्षणात भारत 133वा आहे, म्हणजे असुखकारक आहे. सर्वात सुखकारक देश फिनलंड आढळला. चीन 86वा, अमेरिका 18वा व ब्रिटन 19वा व युएई 20वा आहे. बुरूंडी देश शेवटात आहे. फिनलंड सोडून इतर नॉर्डिक देश नॉर्वे, डेन्मार्क, आईसलँड तसेच स्वित्झर्लंड, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन व ऑस्ट्रेलिया हे पहिल्या दहामध्ये आहेत.

 

लोकवस्तीच्या आधारे भारतातील 2030 मधील 7 महानगरे

 

2016 मधील पहिल्या काही देशांची क्रमवारी कंसात क्रम व दशलक्ष लोकसंख्या

 

1. टोकिओ (38.1 दशलक्ष), 2. दिल्ली (26.5 दशलक्ष), 3. शांघाय (24.5 दशलक्ष), 4. मुंबई (21.4 दशलक्ष), 5. सावो पावलो (21.3 दशलक्ष), 6. बीजिंग (21.2 दशलक्ष), 7. मेक्सिको ( 21.2 दशलक्ष), 8. ओसाका (20.3 दशलक्ष), 9. कैरो (19.1 दशलक्ष), 10. न्यूयॉर्क (18.6 दशलक्ष), 14. कोलकाता (15 दशलक्ष), 28. हैद्राबाद (12.5 दशलक्ष), 29. बंगळुरू (10.5 दशलक्ष), 30. चेन्नई (10.2 दशलक्ष).

 

2030 मध्ये होणारी अंदाजे क्रमवारी

 

1. टोकिओ (17.2 दशलक्ष), 2. दिल्ली (36.1 दशलक्ष), 3. शांघाय (30.8 दशलक्ष), 4. मुंबई (27.8 दशलक्ष), 5. बीजिंग (27.7 दशलक्ष), 6. ढाका (27.4 दशलक्ष), 7. कराची (24.8 दशलक्ष), 8. कैरो (24.5 दशलक्ष), 9. लागोस (24.2 दशलक्ष), 10. मेक्सिको (23.9 दशलक्ष), 15. कोलकाता (19.1 दशलक्ष), 21. बंगळुरू (14.8 दशलक्ष), 24. चेन्नई (13.9 दशलक्ष), 38. अहमदाबाद (10.5 दशलक्ष). सध्या 50 टक्क्यांहून जास्त लोकसंख्या नागरी प्रदेशात आहे. ‘युनो’च्या मते, 2050 मध्ये नागरी प्रदेशांचे शतमान 66 टक्क्यांवर जाईल.

 

काही देशांची लोकसंख्या-

 

घनता प्रति चौ. किमी - खालीलप्रमाणे

 

ढाका (बांगलादेश) 44,500, मुंबई (भारत) 31,700 मेडेलिन (कोलंबिया) 14,800 मनीला (फिलीपाईन्स), 14,800 कासाब्लान्का (मोरोक्को), 14,200 लागोस (नायजेरिया) 13,300 कोटा (भारत), 12,100 सिंगापूर, 10,200 जकार्ता (इंडोनेशिया) 9,600

 

मुंबई किती सुरक्षित?

 

60 शहरांतील सर्वेक्षणानंतर दहशतवाद्यांच्यामुळे मुंबईला शेवटून तिसरा क्रमांक लागतो. आरोग्याच्या बाबतीत शेवटून सहावा क्रमांक आहे. सेवावाहिनीबाबत शेवटून दहावा क्रमांक आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू होण्याच्या बाबतीत शेवटून अकरावा क्रमांक मिळाला आहे.

 

व्यवसायसुलभतेमध्ये - मुंबईच्या मदतीने भारताचा क्रमांक 100वा लागला.

 

वायुप्रदूषण - मुंबई, नवी मुंबई, पुणे आदी शहरांमधील प्रदुषणात वाढ होत आहे व 17 शहरे सर्वाधिक प्रदुषित आहेत. मुंबईत 50 ठिकाणी तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, व चंद्रपूर या पाच महानगरपालिका क्षेत्रांत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याबाबत नियोजन सुरू आहे.

 

जैवविविधता नष्ट होण्याबाबत- 2012-17 या काळामध्ये वाघ, हत्ती इत्यादी वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण रस्त्यावरच्या अपघातात 431 व रेल्वे अपघातात 234 इतके आहे. असे एकूण 665 प्राणी दगावले.

 

युरोपातील देश प्राण्यांचे असे अपघाती मृत्यू कमी व्हावे, म्हणून रस्त्यावर व महामार्गांवर वाहनातून प्रकाशाची व आवाज देण्याची व्यवस्था करतात. दक्षिण आफ्रिका देशात वन्यप्राण्यांच्या प्रवासाकरिता वेगळे मार्ग आखले आहेत.

 

शहरांमधील नवीन बदलांबाबत - सर्वेक्षणानंतर पहिले 10 देश असे आढळले - स्वित्झर्लंड, नेदरलंड, स्वीडन, युके, सिंगापूर, युएसए, फिनलंड, डेन्मार्क, जर्मनी, आयर्लंड. चीन 17वे, रशिया 46वे, भारत 57वा, दक्षिण आफ्रिका 58वे, ब्राझिल 64वे आढळले आहे.

 

शक्तिमान पारपत्र बनण्यात - सिंगापूरला प्रथम स्थान मिळाले आहे, जर्मनी दुसरे, स्वीडन व दक्षिण आफ्रिका तिसरे स्थान व भारताला 75वे स्थान मिळाले आहे.

 

नियोजनकारांनी भारतातील ‘स्मार्ट’ शहरांच्या दर्जावाढीकरिता व विश्वात पत वाढण्याकरिता निर्देशांकात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. चंदीगढ, नवी मुंबई, लवासा, नया रायपूर (अटल नगर), गुजरात इंटरनॅशनल फिनॅन्स टेक (ॠखऋढ), जमशेतपूर, भुवनेश्वर व गांधीनगर ही शहरे नवीन बनली वा बनत आहेत व त्या तिथे शहर दर्जावाढीचे मुद्दे विचारात घेता येतील.

@@AUTHORINFO_V1@@