विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

प्रकल्प अधिकाऱ्यांना मारहाण

 
 
 
 
नंदुरबार : सलसाडी ता. तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेतील ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांची प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, प्रभारी पोलीस निरीक्षक यादव भदाणे, व पोलिसांना मारहाण केली.
 
प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांची प्रकृती गंभीर असल्याने नंदुरबार येथील जिल्हारुग्णालयात हलविण्यात आले. तहसीलदार योगेश चेंद्रे यांच्यावर आणि पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे यांच्यावर संतप्त जमावाने हल्ला केला जखमीवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@