धुळ्यात जनकल्याण समितीतर्फे केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतफेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |

कष्टकर्‍यांनी दिला प्रतिसाद, पावती पुस्तके कमी पडली

 
धुळे :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे केरळमधील पूरग्रस्त बांधवांसाठी शनिवारी २५ रोजी मदतफेरी काढण्यात आली. दुपारी १ ते सायंकाळी साडेपाच वाजेपेपर्यंत चाललेल्या या फेरीला सर्वच थरातील संवेदनक्षम नागरिकांनी, व्यापारी, दुकानदारांपासून तर पादचारी, रस्त्यावर व्यवसाय करुन पोट भरणार्‍या भाजीपला व अन्य चीजवस्तू विक्रेते तसेच कष्टकर्‍यांनीही मोठा प्रतिसाद दिला.
 
 
दु.१ वा. गांधी पुतळ्यापासून प्रारंभ झाला. पुढे आग्रारोड, पाच कंदील, शिवाजी पुतळा परिसर आणि सराफ बाजार अन्य भागात व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले. केरळमध्ये गेल्या १०० वर्षात झाली नसेल एवढी भयावह जीवितहानी आणि अब्जावधीचे नुकसान झालेले आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
 
 
मदतफेरीचे ६ डबे सुमारे २ हजार लोकांपयर्र्ंत फिरवण्यात आले. काही ठिकाणी एवढा प्रतिसाद लाभला की पावतीपुस्तके कमी पडली. काही दुकानदार, व्यापारी बांधवांनी नवीन कपडेही मदतीदाखल देत सहवेदना व औदार्याची प्रचिती आणून दिली. संघ कार्यकर्त्याची पारदर्शकता, सचोटी आणि उत्कट राष्ट्रभक्तीचा अनुभव यामुळे वाढता सहभाग राहिला, अशा प्रतिक्रिया उमटल्या. संजय चौधरी, प्रशांत मोराणकर, सुभाष कांकरिया, राजेश पाटील, डॉ. पंकज देवरे, सुरेश पवार, घनश्याम जोशी आदी अनेक ५०-६० कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 
 
आज मोजमाप, निधी पाठवण्याचे आवाहन
सोमवारी रकमेची सर्वासमक्ष मोजदाद करण्यात येणार आहे. सुमारे ५०-६० हजार रु. जमतील, असा अंदाज आहे. ३१ ऑगस्टपर्यंत देणगी, मदत स्विकारली जाणार आहे. अंडाकृती बागेजवळील रा.स्व.संघ कार्यालयाच्या तळमजल्यावरील जनकल्याण समितीच्या कक्षात सायंकाळी ५ ते ७ या वेळात मदतनिधी स्विकारला जाणार आहे, सढळ मदतीचे आवाहनही करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@