यावेळी रक्षाबंधन असे साजरे करा...आनंद वाटेल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
ज ही फक्त शोधाचीच नाही तर कलेचीही जननी आहे !
 
 
रक्षाबंधन जवळ येते आहे, आता सगळ्या भावांना आपल्या बहिणींना काय भेटवस्तू द्यायची याचे वेध लागले असतांनाच.... ग्रामीण भागातील, शाळेत जाणाऱ्या परंतु गरिबीमुळे शाळा लवकरच बंद होण्याची दाट शक्यता असलेल्या छोट्या छोट्या मुलींच्या छोट्याशा प्रयोगाला सध्या समाजात चांगलीच वाहवाह मिळत आहे. 
 
 
कोणताही उदयोग करायचा म्हटला की त्यासाठीची वेगळी यंत्रणा उभी करावी लागते, मात्र त्याआधी शाळेची फी भरण्यासाठी, वह्या-पुस्तकांसाठी लगेचच लागणारे पैसे कसे मिळवणार? घराची आर्थिक परिस्थिती कमालीची बिकट. आई-वडिलांकडे पैसे नाही म्हणुन शाळेतून काढून पुन्हा मजुरीला पाठवलं जाऊ शकतं. या गंभीर पेचात अडकलेल्या या एका छोट्याश्या गावातील मुलींनी यावर तात्पुरता उपाय शोधला आणि एक प्रयोग करायचे ठरवले. हा प्रयोग म्हणजे ‘शोधिनी राखी’. आधी प्रत्येकीने साठवलेले थोडे थोडे पैसे जमा करून भांडवल जमवलं आणि रंगीबेरंगी दोरे एकमेकांमध्ये विणून सुंदर राख्या तयार केल्या. 
 
 
 
 
 
या राख्यांच्या माध्यमातून या मुली आपल्या शाळेचा खर्च काढू शकतील व आपल्या आईवडिलांना थोडासा हातभार देखील लावू शकतील. अशी उत्तम कल्पना या प्रयोगामागे असल्याने आपण देखील समाजाचे देणे लागतो आणि म्हणून आपण देखील या प्रयोगाला साथ द्यावी आणि या वेळची रक्षाबंधन आपल्या बहिणीला किंवा भावाला भेटवस्तू न देता समाजात ज्या मुलींना शिकायला पैसे नाही अशा मुलींना आर्थिक हातभार लावून त्यांना त्यांचे उत्कृष्ट भविष्य ही भेटवस्तू द्या. 
 
 
या रक्षाबंधनाला आपल्या सगळ्यांच्या आत दडलेल्या संवेदनशील माणसाला जरा हाक देऊ आणि या आगळ्यावेगळ्या राखीने फक्त बहिण भावामधीलच नाही तर ग्रामीण भागाशीही असलेले आपले नाते आणखी भक्कम करू असा संदेश यातून देण्यात आला आहे. 
 
 
अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट या नाशिकमधील सामाजिक संस्थेअंतर्गत ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाविषयी कृतीसंशोधनाचे काम करत आहे. नाशिक जिल्ह्यातील दहा गावांमधील एकूण १०० मुली इथे ‘शोधिनी’ नावाच्या प्रयोगाच्या माध्यमातून आपापल्या गावातील मुलींच्या आयुष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संशोधनातून या मुलींच्या असे लक्षात आले की आपल्या गावात मुलींना रोजगार मिळवण्यासाठी शेतात मजुरी करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही आणि याआधारेच मुलींना ही ‘शोधिनी राखी’ची आगळीवेगळी कल्पना शोधून काढली. 
 
 
संपर्कासाठी अभिव्यक्तिच्या 0253 2346128 किंवा अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंटची सहकारी काजल बोरस्ते यांना 9527512494 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@