साईबाबांच्या त्रिसुत्रीचे प्रत्यक्ष जीवनात आचरण हवे: डॉ. मोहनजी भागवत

    22-Aug-2018
Total Views |



सरसंघचालकांचे साईबाबांना वंदन

 

शिर्डी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज आपल्या शिर्डी भेटीदरम्यान साईबाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत त्यांना वंदन केले. यावेळी मोहनजींनी दर्शनानंतर आपला अभिप्राय नोंदवहीत नोंदविला. त्यात मोहनजी यांनी “समाज जीवनाचा केंद्रबिदू मानून सामान्य समाजातील सर्व घटकांचे चिंतन करण्याचे कार्य साईबाबा संस्थानाद्वारे केले जात आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. याप्रकारे श्रद्धा, सबूरी आणि सबका मालिक एक हे साईंनी सांगितलेल्या त्रिसुत्राचे प्रत्यक्ष जीवनात आचरण होत आहे. त्यामुळे समाजात भक्ती व सेवा यांचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. सर्व विश्वस्त आणि कार्यकर्त्यांचे हे कार्य कौतुकास पात्र आहे. त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा” असे प्रशंसनीय उद्गार नमूद केले. दरम्यान, मोहनजी शिर्डी येथे पावणेदोनशे वर्षाची परंपरा असलेल्या गंगाहरी महाराज हरिनाम सप्ताहात भाग घेण्यासाठी आले आहेत. या सप्ताहात ते महंत रामगिरी महाराजांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहलता कोल्हे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे -पाटील आदी उपस्थित होते.

 
 
 
 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौर, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहलता कोल्हे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे-पाटील आदी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/