
जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले आहे. २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिने ही कामगिरी केली आहे. पहिल्या फेरीपासूनच राही अग्रेसर ठरली. थायलंडच्या प्रतिस्पर्धीने खेळाडूने तिच्यावर मात करण्याचा खूप प्रयत्न केला. दोघांना समान गुणही मिळाले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शूटऑफ घेण्यात आले. या शूटऑफमध्ये राही ३-२ या गुणसंख्येने प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली. राही सरनोबतला मिळालेल्या सुवर्णपदकामुळे भारताने कमावलेल्या पदकांत भर पडली आहे. भारताला मिळालेले हे ४ थे सुवर्णपदक आहे.
२५ मीटर एअर पिस्टल प्रकारात कोल्हापूरच्या राही सरनोबतला गोल्ड मेडल, भारताचं चौथं सुवर्ण...
— महा MTB (@TheMahaMTB) August 22, 2018
#AsianGames2018 pic.twitter.com/pzdOeSsNpi
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/