भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय

    22-Aug-2018
Total Views |


 

 

जकार्ता : इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय हॉकी संघाने हॉंगकॉंगला २६-० अशा मोठ्या फरकाने मात देत ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघासमोर कमकुवत ठरलेल्या हॉंगकॉंग संघाला एकही गोल करता आला नाही. दरम्यान, भारतीय हॉकीच्या इतिहासात हा सर्वात मोठा विजय असून ८६ वर्षांपूर्वी (१९३२) ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने अमेरिकेचा २४-१ ने पराभव केला होता. त्यानंतरचा हा हॉकीमधील भारताचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. या आधी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान इंडोनेशियाला भारतीय संघाने १७-० अशा फरकाने धूळ चारली होती. या विजयामुळे भारतीय हॉकी संघाच्या खात्यात एकूण ६ अंक झाले असून 'अ' गटात सर्वोच्च स्थानावर विराजमान आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/