पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांची मोहोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
लाहोर : माजी क्रिकेटपटू आणि तेहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या पंतप्रधान पदाचे उमेद्वार इम्रान खान यांच्या नावावर पाकिस्तानचे पंतप्रधान पद शिक्कामोर्तब झाले आहे. इम्रान खान आज पाकिस्तानचे २२ वें पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. काल नॅशनल असेंब्लीमध्ये १७६ मतांनी जिंकून पंतप्रधान पदाचा रस्ता इम्रान खान यांच्यासाठी मोकळा झाला आहे. 
 
इम्रान खान यांच्या विरुद्ध लढणारे मुस्लीम लीगचे शहबाज शरीफ यांना ९६ मत मिळाली असून बिलावल भुट्टो याचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पक्षाने या मतदानात सहभाग घेतला नव्हता. पाकिस्तानमध्ये यावेळी २५ जुलैला मतदान झाले होते. ज्यात ११६ जागांसोबत सगळ्यात मोठा पक्ष तेहरीक-ए-इंसाफ हा पुढे आला होता. 
 
 
२५ जुलैला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूकीसाठीची मतमोजणी झाली होती या मतमोजणीत तेहरीक-ए-इंसाफ पक्षाला सगळ्यात जास्त मत मिळाली होती. त्यामुळे इम्रान खान हे या पक्षाच्या पंतप्रधान पदाचे उमेद्वार असल्याने यांचे नाव पंतप्रधानपदी येणार होते.
 
 
काही राजकीय कलहामुळे इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यास विरोध दर्शिविला जात होता मात्र, आता पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने ४ संसदीय मतदारसंघातून इम्रान खान यांना विजेता घोषित केले असल्याने पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यास इम्रान खान याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे इम्रान खान हे अध्यक्ष आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@