सपट अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018
Total Views |


 

 

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित आर.एच. सपट अभियांत्रीकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रीकी विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा नुकताच संपन्न झाला. बारावी नंतर पवेशप्रकियेच्या दिव्यातुन पार पडलेल्या विद्यार्थ्यानी पूर्वी अर्जित केलेल्या ज्ञानाची उजळणी व्हावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने विशेष अशा ब्रिज कोर्सचे आयोजन करण्यात येते. त्याचाही समारोप या प्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सचिव सर डॉ. मो.. गोसावी, प्रकल्प संचालक पी.एम.देशपांडे, आस्थापन संचालक शैलेश गोसावी, प्राचार्य डॉ. पी.सी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

याप्रसगीं उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मो.. गोसावी म्हणाले की, गोखले एजुकेशन सोसायटी ही मोठी आहे, जुनी आहे, पण अभियांत्रिकि महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर मात्र तीची गुणवत्ता आणि पारदर्शकता अधिकच विस्तृत झाली आहे आणि याचे सर्व श्रेय जाते ते विद्यर्थ्यांना आणि प्राध्यापकवृंदानाच. येथील प्राध्यापक वर्ग हा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी, आपला विद्यार्थी हा सक्षम बनवा यासाठी सातत्याने नवनवीन कल्पना आणि उपाययोजना राबवत असतो. त्यातील एक उदाहरण म्हणजेच ब्रिजकोर्स हे आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे इंग्रजी हे कच्चे असते किंवा बोलताना भीती वाटते. अशा बाबींचा विचार करून आम्ही तीन शिक्षक खास विद्यार्थ्यांचा संवाद कौशल्यचा विकासासाठी नेमले आहेत. महान समग्र व्यक्तिमत्व (ग्रेट होलिस्टिक पर्सनॅलिटी) घडविणे जी देशहितासाठी योग्य असेल हेच यामागचे कारण आहे असेही गोसावी सर म्हणाले. यादरम्यान ध्येयाबद्दल बांधिलकी (कंमिटमेन्ट टू एक्ससिल्लेन्स), सचोटी (इंटेग्रिटी ) आणि समर्पण (डेडिकेशन टू कॉज) ही तीन मूल्ये अंगी असले तरच सुंदर व्यक्तिमत्त्व निर्माण होते.

 

डॉ. पी.सी. कुलकर्णी यांनी या वर्षी अभियांत्रिकी एम सी यांच्या प्रथम वर्षात झालेल्या प्रवेशांदर्भात माहिती दिली. कार्यक्रमासाठी आर. डी. जोगी विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम चौधरी यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रांजली देशमुख यांनी केले.

 

ब्रिज कोर्स म्हणजे काय?

 

ब्रिज अर्थात सेतू बंधणाचा हा उपक्रम आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणानंतर अभियांत्रीकी शाखेत येतांना बारावीचे ज्ञान असणे आवश्यक असते. मात्र, विलंबीत असणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमुळे अर्जित केलेल्या गतज्ञानाचा विसर विद्यार्थ्यांना पडतो. त्यामुळे या कोर्सच्या माध्यामतुन बारावीच्या अभ्यासक्रमाची उजळणी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येते.

@@AUTHORINFO_V1@@