'अटल' सूर्याचा अस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2018   
Total Views |



 
 

आज अटलजी गेले हे कळलं आणि आपल्याच घरातील कुणीतरी गेलं असं वाटून धस्सकन वास्तवाची जाणीव झाली. माझ्या घरातील संपूर्ण वातावरण आधीपासून संघ परिवाराचं. आम्ही मुंल संघाची पद्य ऐकत आणि या सर्व दिग्गज व्यक्तिमत्वांच्या यशोगाथा ऐकत मोठे झालो आहेत. त्याकाळात बाकी काही कळत नसलं तरी अटलजी पंतप्रधान आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती इतकंच कळायचं. हळू हळू मोठे होत गेलो आणि त्यांच्या दिग्गज व्यक्तिमत्वाची आणखीनच जाणीव होत गेली.

भारतीय जनसंघाची स्थापना करणाऱ्या प्रमुख दिग्गज नेत्यांपैकी ते एक होते. १९६८ ते १९७३ पर्यंत ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असून त्यांनी देशाचे सर्वोच्च स्थान म्हणजेच "पंतप्रधान" पद अतिशय कौशल्याने भूषवले. ते पंतप्रधान असताना अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. केवळ एकमताने सरकार पडण्याची घटना देखील त्यांच्याच काळात घडली. मात्र त्या एका घटनेने एक राजकीय व्यक्तिमत्व कसं असावं हे सांगत सगळ्यांचे खाडकन डोळे उघडले.

 

"सत्ता का खेल तो चलता रहेगा, 
सरकारे आएँगी, जाएँगी..
पार्टियाँ बनेंगी बिगडेंगी. लेकिन यह देश रहना चाहिए..
इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिये.."
 
 
 
 

 

असे उच्च विचार असणाऱ्या या दिग्गज नेत्याच्या डोळ्यातील धगधगत्या ज्वाल्यांची आग "मैं राष्ट्रपती महोदय को अपना त्यागपत्र देने जा रहा हूँ.." असे म्हणताना आपल्याला देखील जाणवली.

 

कारगिलच्या युद्धाचे यश ज्या प्रमाणे देशातील जवानांना जातं, त्याच प्रमाणे ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सारख्या कुशल नेतृत्वाला देखील जातं. त्यांच्या ओजस्वी वाणीने त्यांनी केलेली अनेक भाषणं माझ्या सारख्या अनेक त्याकाळात लहान असणाऱ्या मात्र आता त्यांच्या व्यक्तिमत्वाची जाणीव असणाऱ्या लोकांच्या मनात घर करुन रहात असतील.

 

त्यांची इच्छा नेहमीच "जंग" न होऊ देण्याची होती. भारत युद्धाच्या बाजूने नाही.. त्याला शांतता हवीये मात्र "स्वत:च्या देशाच्या रक्षणासाठी भारतात परमाणू परीक्षण व्हायला हवं" या मताचे ते होते, आणि शांततेचा संदेश देत करण्यात आलेले परमाणू परीक्षण "बुद्ध मुस्कुराएँ" ऐतिहासिक ठरलं.

 

राम मंदिराचा प्रश्न त्यांच्या काळात खूप गाजला. त्यांचं "मैदान को समतल करना होगा.." भाषण अजरामर झालं.

 

त्यांच्या कविता माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. माझ्या नृत्यगुरु नीरजा बोधनकर यांनी "अटलजींच्या कवितां"वर एक नृत्य कार्यक्रम केला होता, तो कार्यक्रम पाहूनच मी नृत्य शिकायला सुरुवात केली. "बरफ ढकी पर्वत मालाएँ किन्नरियों का देश" किंवा "हम जगं न होने देंगे" त्यांच्या या कविता आजही पाठ आहेत. मला त्यांची सगळ्यात जास्त आवडणारी कविता म्हणजे...

 
 
 
 

"टूटे हुए तारों की सुने कौन सिसकी,
अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी.
हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ..
गीत नया गाता हूँ..."
 

 

त्यांच्या या ओळींमधून दरवेळी उठून लढण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या कवितेतून त्यांचं संवेदनशील मन नेहमीच दिसून आलं आहे. मग ती "एक बरस बीत गया.." असू देत नाही तर "दूर कहीं कोई रोता है.." असू देत. प्रत्येक कवितेने प्रत्येक ओळीने त्यांच्या भावना जाग्या केल्या आहेत.

 

"भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ.."
 

 

अटलजींना "अखंड" भारत हवा होता. एका सूत्रात जोडलेला भारत. त्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. पाकिस्तानसोबत आपले संबंध सुधारावे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. आयसी -८१४ अपहरण घटनेत "मौलाना मसूद अजहर" ला सोडताना त्यांना देखील तितक्याच वेदना झाल्या होत्या. मात्र भारतवासियांच्या जीवाच्या रक्षणासाठी त्यांनी टीकांचे विषप्राशन केले.

 

दिन दूर नहीं खंडित भारत को 
पुन: अखंड बनाएँगे।
गिलगित से गारो पर्वत तक 
आज़ादी पर्व मनाएँगे।।

 

उस स्वर्ण दिवस के लिए आज से 
कमर कसें बलिदान करें।
जो पाया उसमें खो न जाएँ, 
जो खोया उसका ध्यान करें।।
 

 

संवेदनशील मन असलेल्या अटलजींची प्रशंसा त्याकाळच्या विरोधी पक्षाने देखील केली. त्यांच्या सारखे कुणी नव्हते, त्यांच्या सारखे कुणी होणारही नाही. ते गेले आणि देशाच्या राजकारणातील, साहित्यातील एक तेजपुंज मोती निखळला. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कदाचित ही पोकळी कधीच भरून निघणार नाही.. कधीच नाही..

 
 
 
 

"बाधाएँ आती हैं आएँ
घिरें प्रलय की घोर घटाएँ,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते-हँसते,
आग लगाकर जलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।"
 

 

एकदा पुन्हा संसदेत अटलजींना भाषण देताना प्रत्यक्ष बघायचंय, पुन्हा एकदा त्यांच्या खड्या आवाजात त्यांची "कदम मिलाकर चलना होगा.." कविता ऐकायची आहे. पुन्हा एकदा "मैदान को समतल करना होगा ऐकायचंय". आगामी काळात येणाऱ्या निवडणुकींमध्ये, संसदेत पंतप्रधान मोदी भाषण देत असताना, संपूर्ण भारतात कमळ फुलत असताना... आमच्या सारख्यांना त्यांनी आठवण नक्कीच येणार..

 

- निहारिका पोळ 
१६.०८.२०१८

 

@@AUTHORINFO_V1@@