स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात बडनेरा स्वच्छतेत आघाडीवर तर खंडवा शेवटच्या क्रमांकावर

    14-Aug-2018
Total Views |

 
 

  स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान 
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात बडनेरा स्वच्छतेत आघाडीवर तर खंडवा शेवटच्या क्रमांकावर

जळगाव, 14 ऑगस्ट
रेल्वे प्रशासनाने स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान राबविले होते. या अभियानात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 10 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. यात बडनेरा रेल्वे स्थानक 26 व्या क्रमांवर आले असून भुसावळ विभागात प्रथम तर खंडवा रेल्वे स्थानक भुसावळ विभागात शेवटच्या क्रमांकावर आले आहे.
 
 
भुसावळ विभागातील अकोला 27 वा क्रमांक, नाशिकरोड 41, अमरावती 78, भुसावळ 101, शेगाव 110, चाळीसगावा 135, जळगाव 184, बु-हानपूर 202 आणि खंडवा 283 व्या क्रमांकावर आहे.
भुसावळ विभागीय डीआरएम कार्यालयातर्फे स्वच्छते बाबत विविध उपक्रम राबवून सुध्दा भुसावळ चा क्रमांक 101 राहिला आहे.