मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात नवे वसतिगृह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |

स्वातंत्र्यदिनी होणार पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 



अकोला : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज शहरातील शासकीय अध्यापक महाविदयालाच्या वसतिगृहाची पाहणी केली. सर्व बाबींनी सुसज्ज असलेले हे वसतिगृह मराठा समाजाच्या विदयार्थी आणि विदयार्थींनीसाठी येत्या १५ ऑगस्टला उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यादृष्टीने याच दिवशी वसतिगृहाचे उदघाटन केले जाईल, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यात वसतिगृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सर्व सुविधायुक्त हे वसतिगृह राहणार आहे. त्यामुळे प्रमुख शहरात राहून शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. नवीन वसतिगृहाचे बांधकाम होईपर्यंत शासकीय अध्यापक महाविदयालयातील वसतीगृह मराठा समाजातील विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. त्याचे रितसर उदघाटन १५ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. विदयार्थ्यांना राहण्याच्या सोईबरोबरच या ठिकाणी स्वतंत्र अभ्यासिका, स्पर्धा परिक्षा केंद्र, वाचनालय तसेच जिमची व्यवस्था जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्ण योजनेतून करुन देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजासाठीच्या योजनांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात घेणार कार्यशाळा


तरूण-तरुणींना विविध व्यवसाय - उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या १० लाख रूपयांपर्यंतच्या कर्जास शासनाने हमी दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच या कर्जाचे व्याज शासनामार्फत भरले जाणार असल्याने आता तरुणांना बँकांमार्फत तात्काळ कर्ज उपलब्ध होईल, याच लाभ तरुणांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा जास्तीत जास्त प्रचार होण्याकरीता येत्या १८ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, असल्याचे देखिल पाटील यांनी सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@