मराठा आरक्षणासाठी 'जिवंत समाधी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |



औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी औरंगाबादमध्ये उपोषणाला बसलेल्या एका मराठा तरुणाने जिवंत समाधी घेण्याचा इशारा सरकारला दिला आहे. औरंगाबादमधील क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या पांडुरंग सवने पाटील या तरुणाने याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून येत्या १५ ऑगस्टला आपण जिवंत समाधी घेणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

सवने हे गेल्या २४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषणाला बसले आहेत. सरकारला वारंवार मागणी करून देखील आरक्षण अजून लागू झालेले नाही. तसेच आतापर्यंत तब्बल ३१ तरुणाने आरक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन देखील सरकार काहीही करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या १५ ऑगस्टला मध्यरात्री आपण क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या  पायथ्याशी जिवंत समाधी घेत आहोत, असे सवने यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सवने यांच्या या निवेदनानंतर औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सवने गेले २४ दिवस उपोषणाला बसल्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात आदर निर्माण झालेला आहे. त्यामुळे सवने यांनी काही विचित्र पाऊल उचलल्यास जिल्ह्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण होऊ शकतो.    
@@AUTHORINFO_V1@@