आपला आधार क्रमांक सार्वजनिक करू नका : युआयडीएआय

    01-Aug-2018
Total Views | 38



नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे अध्यक्ष आरएस शर्मा यांनी आधार क्रमांकावरून हॅकर्सना दिलेल्या आव्हाननंतर आता युआयडीएआयने नागरिकांसाठी एक विशेष सूचना जारी केली आहे. युआयडीएआयने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचा इशारा दिला असून आपला आधार क्रमांक कोणीही सार्वजनिक करू नये, असा सल्ला युआयडीएआयने दिला आहे. त्यामुळे आधारच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा प्रश्ननिर्माण निर्माण होऊ लागला आहे.


युआयडीएआयने याविषयी ट्विट करून नागरिकांना सूचना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये काही बातम्या समोर येत आहेत कि, काही लोक आपला आधार क्रमांक सार्वजनिक करून काही लोकांना आव्हाने देत आहेत. परंतु असे करणे पूर्णपणे चुकीचे असून नागरिकांनी आपला आधार क्रमांक सार्वजनिक करू नये, असे युआयडीएआयने म्हटले आहे. याचबरोबर आधार क्रमांक हा देशातील नागरिकांची ओळख पटावी, यासाठी म्हणून तयार करण्यात आलेला आहे. या आधार क्रमांकाशी नागरिकांची अनेक गोपनीय माहिती जोडली गेलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहून फक्त गरज असेल त्याच ठिकाणीच आधार क्रमांक द्यावा, अशी सूचना देखील युआयडीएआयने दिली आहे.








ट्रायचे अध्यक्ष आरएस शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपला आधार क्रमांक आपल्या सोशल मिडीयावर शेअर करून आपली गोपनीय माहिती उघड करण्याचे आव्हान हॅकर्सना दिले होते. यानंतर काही हॅकर्सनी शर्मा यांच्या आधार क्रमांकाच्या सहाय्याने त्यांची बरीचशी माहिती मिळवल्याचा दावा केला होता. तसेच काही पुरावे देखील त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले होते. परंतु शर्मा यांनी हे दावे फेटाळून लावले होते. पण यामुळे सोशल मिडीयावर मात्र आधारच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. तसेच आधार क्रमांक सार्वजनिक करणे खरंच सुरक्षित आहे का ? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ(एमकेसीएल) पनवेल यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'भरारी २०२५' हे करिअर विषयक मोफत मार्गदर्शन शिबीर पनवेल येथे आज (दि. १०) आयोजित करण्यात आले...

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी याबाबत माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121