अतिवृष्टीत आर्थिक नुकसान झालेल्या नागपुरकरांना नुकसान भरपाई मिळणार : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |

 
 
 
नागपूर : "६ जुलै रोजी नागपूर येथे भीषण पाऊस झाल्याने अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावे लागले आहे, मात्र याची जबाबदारी शासन घेणार असून आर्थिक नुकसान झालेल्या नागपुरकरांना शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे." अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज ते बोलत होते. यावेळी त्यांनी ६ जुलै रोजी पडलेल्या पावसाची आणि नागपूरच्या परिस्थितीची माहिती दिली.
 
 
 
 
 
" ६ जुलै २०१८ रोजी नागपूर येथे गोल्या २४ वर्षातील सगळ्यात अधिक पाऊस पडला. या आधी १९९४ मध्ये ३०० मि.मि. पाऊस पडला होता. मात्र यावेळी केवळ ६ तासातच नागपुरात २८३ मि.मि. पाऊस पडला. यामुळे संपूर्ण नागपुर जलमग्न झाले होते. साधारणपणे नागपुरात गेल्या २४ वर्षात १५० मि.मि. पाऊस पडतो. मात्र यांदा पावसाने केवळ ऑगस्टच नाही तर जून आणि ऑगस्ट मिळून जी सरासरी असेल एवढा पाऊस केवळ ६ तासात पडता. नागपूर येतील सांडपाण्याची विल्लेवाट लावण्याची क्षमता १२५ मि.मि.ची आहे. मात्र अचानक इतका पाऊस पडल्याने ही अवस्था झाली. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे." असेही ते यावेळी म्हणाले.
 
पोलिसांचे विशेष कौतुक :

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. "दरवेळी केवळ शिव्याशाप ज्यांना मिळतो अशा पोलिसांनी नगरपालिकेसोबत मिळून या परिस्थितीत उत्तम काम करत आपली भूमिका चोख निभावली. यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापनात खूप मोठे योगदान दिले, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक." असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@