राईनपाडा येथे झालेल्या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा होणार : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
 
नागपूर :  धुळे जिल्ह्यातील राईनपाडा (ता. साक्री) येथे ५ जणांची हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. निघृण शब्द देखील यासाठी कमी पडेल अशी ही घटना आहे. या घटनेतील सर्व गुन्हेगारांना ठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल." असे आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज ते बोलत होते.
 
 
 
 
"या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडिओ फुटेज मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने प्रत्येक आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली जात आहे. या घटनेत कुणाचीही गय केली जाणार नाही. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल." असेही ते यावेळी म्हणाले.
 
भटक्या जातींच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी सरकारची :

"या भटक्या जातींच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून त्यासंदर्भात लवकरच एक बैठक घेऊन विस्तृत पुनर्वसन योजना आखण्यात येईल. हा समाज अतिशय साधा आणि गरीब समाज आहे. त्यांच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी सरकारची आहे." असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@