मिशन दिनदयाल योजनेंतर्गत स्वस्त धान्य एपीएल गटाला पुरविण्याची घोषणा : सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2018
Total Views |
 
 
चांद्यापासून बांद्यापर्यंत चंद्रपूरचाच पहिला क्रमांक असावा  
चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा नामोल्लेख होतो. त्यामुळे योजना कोणतीही असो, उपक्रम कोणताही असो, चंद्रपूर जिल्हा हा पहिला असला पाहिजे, चंद्रपूरच्या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेने, चंद्रपूर व बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकाने, एव्हरेसर करणा-या आदिवासी आश्राम शाळेच्या विद्यार्थ्यांनी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीने आपले उपक्रम, आपल्या योजना, आपल्या पायाभूत सुविधा, कायम अव्वल आणि वेगळेपणाचे असल्याची पायाभरणी केली आहे. त्यामुळे येणा-या काळातही चांदापासून बांदापर्यंत कोणत्याही क्षेत्रात आमचा पहिला क्रमांक असला पाहिजे, त्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
 
 
बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी राज्य शासन राबवित असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजना, दारिद्र रेषेखालील सर्व नागरिकांना मिशन दिनदयाल योजनेंतर्गत स्वस्त धान्य २ रुपये व ३ रुपये दराने वाटप करणे, जिल्हयात पाणी पातळी वाढविण्यासाठी वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पातील कमी खर्चाचा प्रकल्प राबविणे, प्रशासनात अफलातून आयडीया देणा-या नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या खोज स्पर्धेचे बक्षिस वितरण व जिल्हयात राबविण्यात आलेल्या अभिनव प्रकल्पाच्या घडिपुस्तिकांचे विमोचन आणि लोकप्रिय हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेच्या नव्या संक्षिप्त क्रमांकाचे लोकार्पण करण्याच्या भरगच्च कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. जिल्हयातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधी, स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांना यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते.
 
 
यावेळी बोलतांना त्यांनी चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांनी आपल्या गुणवत्तेच्या, कष्टाच्या बळावर अनेक क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे. प्रशासनात जनतेचा सहभाग हळुहळु वाढत आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये विविध नियम, कायदे, अधिकार जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे असते. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षात अशाच अभिनव कल्पना राबविण्यात आल्या. आज त्याचे सादरीकरण, अहवाल संकलन आणि गुणवंत्तांचे कौतुक होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जिल्हा विविध क्षेत्रात कायम अग्रेसर असावा, यासाठी सामान्य जनांनी, शासकीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@