आता रायगडावर फिरण्यासाठी पाळावे लागणार 'नियम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |

सेलिब्रिटींच्या फोटोंनंतर रायगड विकास प्राधिकरण बनवणार नवे नियम






कोल्हापूर : रायगड किल्ल्याचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी आता लवकरच किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी खास नियमावली तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूरचे खासदार युवराज संभाजीराजे यांनी आज केली आहे. सिनेअभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी रायगडावरील मेघडंबरीवर चढून काढलेल्या वादग्रस्त फोटोनंतर संभाजीराजे यांनी ही माहिती दिली असून आजच रायगड विकास प्राधिकरणाच्या होणाऱ्या बैठकीत ही नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


संभाजी राजे यांनी थोड्यावेळापूर्वीच ट्वीट करून याविषयी माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये अगोदर त्यांनी रवी जाधव आणि रितेश देशमुख यांच्या कृतीवर टीका केली आहे. मेघडंबरीवर चढून महाराजांकडे पाठ करून फोटो काढणे हे अत्यंत निंदनीय आहे, असे संभाजी राजे यांनी म्हटले आहे. तसेच या कृत्यांना आळा घालण्यासाठी म्हणून आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीअध्ये हा मुद्दा मांडण्यात येईल, तसेच किल्ल्यावर वावरण्यासंबंधी एक नियमावली तयार करण्यात येणार असून हे नियम सर्वाना लागू असणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.




अभिनेता रितेश देशमुख आणि रवी जाधव हे नुकतेच रायगडवर गेले होते. त्यावेळी अतिउत्साहा पोटी दोघांनीही महाराजांच्या मेघडंबरीवर चढून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करून फोटो काढले होते. हे फोटो सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर या दोघांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती. यानंतर रितेश देशमुखने आपले फोटो मागे घेत याविषयी जाहीर माफी देखील मागितली आहे, यानंतरच संभाजीराजे यांनी ही घोषणा केली.



@@AUTHORINFO_V1@@