नवजात बालकाची तस्करी; रांचीत ननला बेड्या

    05-Jul-2018
Total Views |



 

झारखंड : राजधानी रांचीमध्ये मुलांची तस्करी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या संबधी मिशनरीज ऑफ चॅरिटीची एक महिला कर्मचारी अनिमा इंदवार व दोन ख्रिश्चन ननला अटक करण्यात आली आहे. चाइल्ड वेलफेयर कमेटी रांचीच्या अध्यक्षा रूपा वर्मा यांच्या तक्रारीवरून हि कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या ननने चार मुलांची तस्करी केली होती. यातील अनिमा हिने १४ दिवसाच्या नवजात बालकाला १ लाख २० हजार रुपयांत उत्तर प्रदेशमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत असून मिशनरीच्या इतरांनाही अटक करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.