मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी : संजय निरुपम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018
Total Views |

 
 
नागपुर :  आज नागपुर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी टीका करत त्यांनी जनतेची माफी मागावी असे वक्तव्य केले आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत, त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप स्वीकारावा आणि जनतेची माफी मागावी." असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
 
वादग्रस्त जमीन ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाकडे आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी असेही ते म्हणाले आहेत.
 
 
 
 
सिडको जमीन प्रकरणावर न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. या प्रकरणात रायगडचे जिल्हाधिकारी देखील दोषी आहेत. त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी यावेळी निरुपम यांनी यावेळी केली आहे.
 
"या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असल्याशिवाय हे घडूच शकत नाही." असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखविलेले २०० सातबारा हे १९७१च्या आधीचे आहेत. त्यानंतरचा एकही सातबारा त्यामध्ये नाही. मुख्यमंत्री हे सभागृहात खोटे बोलून दिशाभूल करत आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याची माफी मागावी, असे निरूपम म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@