विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |



नागपूर :
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे बऱ्याच दशकांच्या खंडानंतर हे अधिवेशन नागपूर येथे होत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या विषयांवर या अधिवेशनामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. तसेच खरीप हंगाम आणि शेतकरी प्रश्न हे दोन विषय यंदाच्या अधिवेशनाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

यंदाच्या अधिवेशनात एकूण २७ विधेयक सभागृहासमोर मांडण्यात येणार आहेत. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित राहिलेली विधेयक आणि काही नवीन सुधारित विधायक सभागृहात सदर करण्यात येणार आहेत. तसेच राज्यात यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने जास्तीत जास्त फायदेशीर गोष्टींवर यंदा अधिक चर्चा करण्यावर सरकारचा भर असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदरच दिलेली आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन हे पूर्णपणे शेतकरी केंद्रित असणार आहे.

दरम्यान शेतकरी प्रश्नांवरूनच यंदा विरोध देखील जास्त आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी काल नागपूर येथील आपल्या शासकीय निवासस्थानावर आयोजित केलेल्या चहापानावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. तसेच यंदा राज्य सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देखील विरोध यंदाच्या अधिवेशनात सरकारला अधिकाधिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@