महाराष्ट्रातील भाविकांना सुषमा स्वराज यांची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |


 


कैलास मानससरोवर यात्रेकरूंना दिला दिलासा

 

नाशिक : कैलास मानससरोवर यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास ८५ भाविक खराब हवामानामुळे गत चार दिवसांपासुन नेपाळच्या सिमीकोट विमानतळावर अडकुन पडले आहेत. याबाबत नाशिक मधील चौधरी यात्रा कंपनीच्या संचालकांनी नेपाळमधून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क केला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी संबंधित यंत्रणांना मदतीच्या सुचना दिल्या. भारतामार्फत आज दोन विमानेही पाठविण्यात आल्याने अडकून पडलेल्या भारतीय यात्रेकरूंना दिलासा मिळाला आहे.

 

गेल्या आठवड्यात नेपाळमार्गे कैलास मानसरोवर यात्रेला प्रारंभ झाला. यात पहिल्या टप्यात सहाशेहून अधिक भारतीय यात्रे करूंचा समावेश होता. मात्र माघारी फिरतांना २९ जूनला खराब हवामानाचा फटका या भाविकांना बसला. त्यात विमानसेवा प्रभावित झाली. ३० जूनला परतीच्या मार्गावर नेपाळच्या सिमीकोट हवाईपट्टीवर गेलेल्या यात्रेकरूंना पुढे जाण्यापासुन रोखण्यात आले. हवाई सेवा पूर्णत: बंद असल्याने हे सर्व भाविक तेथेच अडकुन पडले. यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या दोन भाविकांचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. सद्यस्थितीत सुमारे दीड हजार यात्रेकरु अडचणीत आहेत. त्यामुळे प्रशासन सक्रीय झाले आहे.

 

दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात येथील चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रीजमोहन चौधरी यांनी विमानतळवरील अधिकाऱ्यांमार्फत भारतात संपर्क केला. केंद्र सरकारशीही संपर्क करण्यात आला. त्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संबधितांना सुचना दिल्या. चीन व नेपाळच्या कार्यालयाशी संपर्क केल्याने आज सकाळी दोन विमाने सिमीकोट विमानतळावर पोहचली आहेत. सकाळी काही काळ विमान सेवा सुरु झाली मात्र दुपारी दोनला ती पुन्हा खंडीत झाली. मात्र, सरकारच्या वेगवान हाचालींमुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे.

 

"कैलास मानसरोवर यात्रेत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली अडचण अत्यंत त्रासदायक ठरत आहे. मोठ्या आनंदाने आणि भक्तीभावाने आम्ही ही यात्रा सुरू केली होती. मात्र हवामन खराब झाल्याने आम्हाला अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमिवर भारत सरकारने दाखविलेली तत्परता ही आमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. आता भगवान कैलासांनी सिमीकोट मधुन आमची लवकर सुटका करावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना".

- ब्रीजमोहन चौधरी

संचालक (चौधरी यात्रा कंपनी. प्रा. लि.)

@@AUTHORINFO_V1@@