ताई बामणेला १५००० मध्ये रौप्यपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |



नाशिक : बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताई बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणार्‍या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या पात्रता फेरी स्पर्धेत ताईने १५०० मीटरमधील वैयक्तिक सर्वोत्कृष्ट वेळेची नोंद केली आहे.

सदर पात्रता फेरी स्पर्धेत ताई बामणे हिने १५०० मीटरमध्ये ४ :२४ :१२ अशी विक्रमी नोंद करीत रौप्यपदक मिळविले. कारकिर्दीतील तिची ही उत्कृष्ट कामगिरी आहे. ताई बामणे ८०० आणि १५०० मीटरमध्ये भारताचे आशास्थान मानले जाते. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ८०० मीटरमध्ये ताईने सुवर्णपदक पटकाविले होते. या कामगिरीमुळे तिची बॅँकॉक येथील पात्रता फेरीसाठी निवड झाली होती. आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धांसाठी खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातून खेळाडूंचा शोध घेण्यात आला होता; त्यातून केंद्राने ताईची निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताचे सक्षम प्रतिनिधीत्व करू शकणार्‍या खेळाडूंच्या यादीत ताईचा समावेश करण्यात आला होता व तो विश्वास ताईन सार्थ ठरविला आहे.

 

ताईचा नवा विक्रम

गुवाहटी येथील ५८ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गटातील अ‍ॅईथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने चमकदार कामगिरी केल्याने तिची यापूर्वीच आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. बंगळूरू येथे झालेल्या टीसीएस जागतिक अँथेलेटिक्स स्पर्धेत संजीवनी जाधवने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवा विक्रमही प्रस्थापित केला होता. यानंतर ताई बामणेने बॅँकॉक येथील स्पर्धेत ४ :२४ :१२ अशी विक्रमी नोंद करीत रौप्यपदक मिळविले.

@@AUTHORINFO_V1@@