अफवांवर नियंत्रण ठेवण्याचे भारत सरकारचे व्हॉट्सअॅपला निर्देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |



नवी दिल्ली : सोशल मिदियावरून पसरत असलेल्या अफवा आणि खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच व्हॉट्सअॅपवरून पसरलेल्या अफवेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला पत्र पाठवले असून यामध्ये व्हॉट्सअॅपद्वारे पसरणाऱ्या अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे निर्देश व्हॉट्सअॅपला देण्यात आले आहेत.


भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने याविषयी व्हॉट्सअॅपला पत्र पाठवले असून यामध्ये व्हॉट्सअॅपला अफवांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. व्हॉट्सअॅप हे सध्या सामाजिक जीवनाशी अत्यंत एकरूप झाले आहे. त्यामुळे नागरिक माहितीची देवाणघेवाण आणि आपल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. परंतु काही समाजकंटक लोक याचा गैरफायदा घेऊन सामाजिक शांतता भंग करू पाहत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपने देखील आपली सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून यावर कारवाई केली पाहिजे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच लवकरात लवकर यावर उपाययोजना करून भारत सरकारला याविषयी माहिती द्यावी, असे निर्देश देखील सरकारने व्हॉट्सअॅपला दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@