शूटर दादीचा अनोखा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018   
Total Views |



वयाच्या बंधनामध्ये न अडकता वयाच्या ६५ वर्षी चंद्रो तोमर यांना त्यांच्यामध्ये दडलेली कला अवगत झाली आणि अल्पावधीतच त्यांनी शूटर दादी म्हणून ओळख निर्माण केली.

 

“असं म्हणातत की एखादी नवीन गोष्ट शिकायची असले ती आत्मसात करायची असले तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये करता येते. मग वेळ, वय या दोन गोष्टींचा विचार केला जात नाही. वय वाढलं की आता हे काम ,एखादी नवीन गोष्ट करणं आपल्याला झेपणार नाही असं म्हणत ते काम करायला नकार देतो. खरंतर वयानुसार काही शाररिक काम करण्यामध्ये अडचणी येत असतात ही बाब खरी आहे. तरी काही व्यक्तींच वय वाढलं असलं तरी प्रबळ इच्छाशक्तीचा बळावर ते वयाच्या चौकटीमध्ये न अडकता कामगिरी बजावत असतात. ८२ वर्षीय चंद्रो तोमर या त्यांच्यापैकी एक. उत्तर प्रदेशमधील बापट जिल्हयातील जोहेरी गावामध्ये राहणाऱ्या चंद्रो तोमर यांनी त्यांची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून चंद्रा तोमर या ओळखल्या जातात. नेहमी इतरांपेक्षा वेगळं काम करण्याची उमेद घेवून जगणाऱ्या चंद्रो तोमर यांचा वयाच्या ८२ व्या वर्षी असणारा उत्साह तरूणांना लाजवेल अशातला आहे. आपल्याला आवडत ते काम करायचा. समस्यांचा ,अडथळांचा जास्त बागुलबुवा करायची नाही असा मोलाचा सल्ला त्या देतात. रायफल शूटींग या क्रीडा प्रकारात चंद्रो यांनी आतापर्यंत सुमारे २५ पदके पटकावली आहेत. त्या जगातील एकमेव सर्वात ज्येष्ठ शार्पशूटर म्हणून ओळखल्या जातात. चंद्रो या सहा जणांची आई आणि तब्बल १५ नातवंडाची आजी असलेल्या चंद्रो यांनी वयाची बंधने झुकारून क्रीडा क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वयाने ज्येष्ठ असलेल्या परंतु मनाने तरूण असलेल्या या क्रीडापटूने वयाच्या ६५ व्या वर्षी रायफर शूटरचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. खरंतर चंद्रो यांनी कधीच आपण आपल्या आयुष्यात ही कामगिरी बजावू असं वाटलं नव्हतं.

 

खरंतर आपल प्रत्येकामध्ये अनेक कला-गुण दडलेले असतात फक्त गरज असले ती ओळखण्याची. एखादी कला आपल्याला अवगत आहे याची जाणिव आपल्याला होत नसते. पण कधीतरी अशी एक वेळ येते त्यावेळेस आपण उत्सुकतेसाठी ती गोष्ट करायला पुढे सरसावतो आणि अनेक वर्षापासून दडलेला कलाकार घडत जातो. चंद्रो यांच्याही बाबतीत असचं काही तरी झालं. चंद्रो यांच्या नातीला जोहरी येथे रायफल क्लब मध्ये प्रवेश हवा होता. त्यावेळी त्या नातीसोबत गेल्या. त्यावेळी चंद्रो यांनी रेंजवर पिस्तुल हाती घेतले आणि लक्ष्यभेद प्रत्येकवेळी अचूकपणे केला. त्यामुळे त्याचे सर्वांनाच अप्रूप वाटले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. “ज्यावेळी मी पहिल्यांदाच माझे पिस्तुल चालविले, मी तरबेज झाले. आणि मी तेथे असलेल्यांना दाखवून दिले की माझे वय माझा अडथळा बनू शकत नाही, असे चंद्रो तोमर सांगातात. जर तुम्ही ठरविले तर तुम्ही कोणतीही कामगिरी उत्तमरित्या पार पाडू शकतात, असा आत्मविश्वास चंद्रो यांना आला. चंद्रो यांनी भारतीय शूटिंग्य क्षेत्रामध्ये कोचची कामगिरी यशवीरीत्या पार पाडली आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय व जिल्हा स्तरावरील अनेक सुवर्ण पदके जिंकली आहेत. चंद्रो यांच्या या साहसाने इतर अनेक मुली आणि महिलांनाही धीर आला आणि त्यांनी या खेळासाठी गावात क्रांती घडवून आणली. आज तेथे २५ महिला आहेत ज्या घराच्या चार भिंतीबाहेर पारंपारिक जबाबदाऱ्या आणि रितीभाती बाजूला ठेऊन आल्या आहेत आणि रायफल क्लब मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. २०१० मध्ये चंद्रो यांच्या कन्या सिमा यांनी रायफल आणि पिस्तुल या क्रीडा प्रकारात पहिले महिलांचे जागतिक पदक हस्तगत केले. त्यांची नात नितू सोळंकी यांनी देखील हंगेरी आणि जर्मनी येथील जागतिक रायफल शूटींग स्पर्धेत भाग घेतला होता. प्रकाशी तोमर या ७७ वर्षांच्या चंद्रो यांच्या नणंदेनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि त्यांनी एकदा पोलीस उपअधिक्षक यांनाही हरविले.

 

आजच्या काळात समाजामध्ये अनेक बदल झाले असले तरी काही लोकांची मानसिकता, एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या दृष्किोन यामध्ये काही फरक पडलेला नाही. चंद्रो यांनी ज्यावेळेस पिस्तुल हाती घेतली त्यावेळेस समाजातील लोकांच्या टीकेला चंद्रो व त्याच्या नणंद प्रकाशी यांना सामोर जावं लागले होते. तिकडचे गावकरी त्यांची टिंगल करायचे. या वयामध्ये ही अशी कामे करून नक्की काय मिळणार आहे. चंद्रो व प्रकाशी यांचा छंदाला ते बजावत असलेल्या कामगिरीला नावं ठेवली जायची. पण अशा मागासवृत्तीची विचारसरणी असलेल्या लोकांच्या टीकाटिप्पणीचा विचार आपण करायचा नाही. फक्त आपलं ध्येय डोळयांसमोर ठेवून त्या दिशेने प्रवास करायचा असे नणंद-भावजयीने ठरवले होते. आणि सातत्य आणि सरावाच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतमध्ये ते सिध्द करून दाखवलं. महत्त्वाची बाब म्हणजे या काळात त्यांच्या कुटुंबाने त्यांना मोलाची साथ दिली. कामामध्ये नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुढची सगळी गणित, यशाचा मार्ग सोपा होवून गेला. आज शार्पशूटरमध्ये चंद्रो यांनी नाव कमावले असले तरी त्यांनी आपली वेशभूषा, संस्कृतीचा देखील तितकाच आदर ठेवला आहे. आज प्रशिक्षण देण्याच्या निमित्ताने, किंवा सत्कार,समारंभाच्या निमित्ताने कुठेही जावे लागले तरी त्या जशा आहेत तशाच वावरण्याचा प्रयत्न करतात.

@@AUTHORINFO_V1@@