अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ला, १८ ठार ४५ जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |

 
 
काबुल : अफगाणिस्तानात आज दिवसभरात विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी झाली. सकाळी ११ च्या सुमारास हेरात प्रांतातून राजधानी काबूलकडे जाणाऱ्या एका बसमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्यामुळे ११ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३१ नागरिक जखमी झाले. बालाबुलुक जिल्ह्यात हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.
 
 
दुपारी १२ वाजता जलालाबाद शहरात काही दहशतवाद्यांनी शहरातील मुख्य वस्तीतील रुग्णालयाजवळ एका चारचाकी वाहनात एक बॉम्बस्फोट घडवून आणला. मात्र त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तालिबान या दहशतवादी संघटनेचा खूप जास्त वावर जलालाबादमध्ये असल्यामुळे हा हल्ला तालिबाननेच घडवून आणला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
 
 
मात्र त्यानंतर हा दहशतवादी हल्लाच असल्याची कबूली अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला तर ८ नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली. जखमींमध्ये २ पोलिसांचा समावेश आहे. तर दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यातही अफगाणी सुरक्षा दलांना यश आले आहे. संध्याकाळी ७ वाजता दहशतवादी व सुरक्षा दलांमधील चकमक बंद झाली. या चकमकीत एकंदर ८ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. दिवसभरात झालेल्या या सर्व हल्ल्यांमध्ये एकंदर १८ जणांचा मृत्यू झाला तर ४५ नागरिक जखमी झाले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@