निवडणूकमा भाजपा, शिवसेनामाच शे खरी लढाई

    31-Jul-2018
Total Views |
 
 
निवडणूकमा भाजपा, शिवसेनामाच शे खरी लढाई
 
 
गम्प्या : महापालिकेना निवडणूक ना प्रचार आज संध्याकाये सरना. तेनामुळे संध्याकायपासून सगळाच पक्षासना उमीदवार, कार्यकर्त्यासना आवाज बंद व्हयी जायेल शे.
टम्प्या : मी संध्याकायले बाहेर पडून तवय नुसती शांतता देखाले भेटनी
गम्प्या : तुले माहीत शे का निवडणूकमा काय चालू शे
टम्प्या : काय व्हयनं, निवडणूकमा
गम्प्या : आते प्रचार सरना पण या दोन दिन उमीदवारासाठे महत्त्वाना शे.
टम्प्या : मतदाना दिन उमीदवारासने भवितव्य नागरिक ठरावतीन
गम्प्या : अरे तुले माहीत शे का?
टम्प्या : भाजपा, सेनामाच खरी लढाई रंगी रायनी
गम्प्या : या दोन पक्षासमा थेट सामना रंगणार शे.
टम्प्या : भाजपामा आणि शिवसेनामाच खरी टक्कर शे.
गम्प्या : हाई एकदम बरोबर शे
टम्प्या : आते उमीदवारेसनी धडधड वाढले शे.
गम्प्या : मतदार कोणले कल देतीन यनावर तेसनं इजयनं गणित शे.
टम्प्या : हाई समजी रायनं माले.
गम्प्या : प्रचारना सोमवार शेवटना दिन व्हता, तेनामुळे शहरमा शांतता व्हयी गई आते.
टम्प्या : कालदीन दिनभर भाजपा, सेनानी रॅली काढीसन शक्ती देखाडनं काम चालू व्हतं
गम्प्या : हा बरंका मी पण देख्यात दोनी पक्षासनी रॅली
टम्प्या : शहरमाधला लोकेसना व कार्यकर्त्यासन्या हाई रॅलीमा मोठ मोठ्या रांगा लागेल व्हत्यात. .
गम्प्या : हाई निवडणूकमा भाजपा आणि सेनामधला मोठा नेत्यासनी प्रतिष्ठा पणले लागेल शे. तेनापायरे दोन्हीसना प्रतिष्ठांनी समस्या व्हयी जायेल शे.
टम्प्या : शहरामधला सगळा प्रश्‍न सोडावसूत असं भाजप व सेना दोनीसना नेता सांगी रायनात.
गम्प्या : पण आते लोकेस ठरावतीन १ तारीखले की कुणाता पक्षांकडे सत्ता देवानी
टम्प्या : शहरन्या कितल्या समस्या आज तशाच पडले शे.
गम्प्या : तेनावर सत्तामधला पक्षासनी कायी करंच नही. यनापायरे सगळा शहरमा नाराजी व्ंहयेल शे.
टम्प्या : तेनामुळे निवडणूकमा लढाई भाजपा, सेनामा थेट शे.
गम्प्या : शहरमाधला हॉकर्स, गायाधारकेसना प्रश्‍न कितलाक वरिसपासून तसाना तसाच पडेल शे. .
टम्प्या : तेसना कोणताही निर्णय व्हयना नाही. तेनामुळे या लोकेसनी नाराजी कायम शे.
गम्प्या : त्या हाई निवडणूक काय करतस हाऊ इषयभी प्रभाव पाडणारा शे.
टम्प्या : रविवारन्या प्रचार सभा इशेष गाजण्यात?
गम्प्या : प्रचारना कायमा शिवसेना व भाजपाना ज्येष्ठ नेत्यासन्या प्रचारसभा व्हयन्यात.
टम्प्या :बुधवारे लोके कोणता पक्षासना उमीदवारेसले संधी देतीन, त्या पक्षाना उमीदवार निवडी येतीन.
गम्प्या : निवडणूकसाठे शहरमा तगडा पोलीस बंदोबंस्त शे.
टम्प्या : शहरामधला काही केंद्रासवर मोठा पोलीसना ताफा शे.
गम्प्या : शहरना चौकचौकमा बाहेर निघना की पोलीस देखाले भेटी रायनात.
टम्प्या : ह्यापाहिले इकास व्हयी येनासाठेच मतदान करानं शे. तेनासाठे मी ह्यापाहिले इचार करी मतदान करसू .