सुधीर मुनगंटीवार म्‍हणजे कर्तव्‍यपरायण हिरा – नानाजी शामकुळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2018
Total Views |
 

 
 
चंद्रपूर : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासकामांचा झंझावात जिल्‍हयात आणला. राज्‍याच्‍या प्रगतीच्‍या दृष्‍टीने अनेक लोकहितकारी निर्णय घेतले. राज्‍याच्‍या आर्थिक प्रगतीसह विकासाचे योग्‍य नियोजन आणि पर्यावरणाप्रती सजगता बाळगत हरीत महाराष्‍ट्राचा ध्‍यास उरी बाळगुन वृक्षलागवडीची महामोहीम राज्‍यात यशस्‍वीपणे राबविली. चंद्रपूरची ओळख ही कोलसिटी अशी असुन या कोलसिटीतुन एक जिवंत कर्तव्‍यपरायण हिरा मुनगंटीवार यांच्‍या रूपाने या जिल्‍हयाला मिळाला आहे. सतत लोककल्‍याणाचा विचार करणा-या या लोकनेत्‍याला दिर्घायुष्‍य लाभावे व त्‍यांच्‍या हातुन सदैव लोकसेवा घडावी यासाठी आम्‍ही भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन रक्‍तदानासह विविध उपक्रम राबवित असल्‍याचे प्रतिपादन भाजपा नेते, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाजी शामकुळे यांनी केले. शहरात आयोजित रक्‍तदान शिबीरांमध्‍ये ८०४ रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान दिले.
 
 
३० जुलै रोजी सुधीर मुनगंटीवार यांच्‍या जन्‍मदिनानिमीत्‍त चंद्रपूरातील गिरनार चौकात रक्‍तदान शिबीराच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील रक्‍तदान शिबीराचे उदघाटन नानाजी शामकुळे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तत्‍पूर्वी चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकालीचे पूजन करून सुधीर मुनगंटीवार यांच्‍या दिर्घायुष्‍यासाठी प्रार्थना करण्‍यात आली. चंद्रपूर जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयात रूग्‍णांना फळवाटप करण्‍यात आले. नानाजी शामकुळे यांनी भाजपाच्‍या अलपसंख्‍यांक आघाडीच्‍या पदाधिका-यांसह चंद्रपूरातील जुना वरोरा नाका येथील दरगाहवर चादर चढवून प्रार्थना केली. बंगाली कॅम्‍प परिसरात मॅराथॉन दौड स्‍पर्धा घेण्‍यात आली. या स्‍पर्धेचे उदघाटन  शामकुळे यांनी हिवरी झेंडी देत केले. या स्‍पर्धेत मोठया प्रमाणावर युवक सहभागी झाले होते.
 
 
सुधीर मुनगंटीवार यांच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधुन शहरातील ५ मंडळांमध्‍ये रक्‍तदान शिबीरांचे आयोजन करण्‍यात आले. बाजार मंडळात अर्थात गिरनार चौकात आयोजित शिबीरात १०० रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान केले. यावेळी नगरसेविकाअनुराधा हजारे, आशा आबोजवार, संजय कंचर्लावार, राजेंद्र अडपेवार, संगीता खांडेकर, शितल कुळमेथे, प्रकाश धारणे, रामू तिवारी, रमेश भुते, निलेश बेडेकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. शहरातील ज्‍येष्‍ठ पत्रकार व रक्‍तदानाच्‍या प्रक्रियेतील प्रख्‍यात समाजसेवक  सत्‍यनारायण तिवारी यांनी सुध्‍दा यावेळी रक्‍तदान केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@