मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2018
Total Views |

गरिबीला कंटाळून उच्च शिक्षित मराठा तरुणाची आत्महत्या




नांदेड : मराठा आंदोलकांनी काहीही झाले तरी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन सरकारने केले असताना देखील आज आणखी एका मराठा तरुणाने घरच्या परिस्थितीला वैतागून आपली जीवन यात्रा संपवली आहे. कचरू दिगांबरराव कल्याणे असे या तरुणाचे नाव असून नांदेडमधील दाभड या गावचे ते रहिवासी आहेत. विशेष म्हणजे संबंधित तरुण हा उच्च शिक्षित असून विवाहित देखील आहे. परंतु घराच्या हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ? या प्रश्नातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आता मराठा समाज आता आणखी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कल्याणे यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी आणि तीन मुली आहेत. कल्याणे हे उच्च शिक्षित असून देखील त्यांना चांगली नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे घरच्या शेतीवरच त्यांचा आणि कुटुंबाचा गुजरा होत होता. परंतु त्यामध्ये देखील शेतमाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे संसाराचा डोलारा सांभाळत मुलींच्या शिक्षणाकडे देखील ते लक्ष देत होते. कष्ट करून देखील घराच्या परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नसल्याचे पाहून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान त्यांच्या या पाउला आसपासच्या गावामधून कमालीची हळहळ व्यक्त केली जात असून आसपासच्या गावातील मराठा समाजाकडून सरकारच्या धोरणांवर रोष व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाची स्थिती अत्यंत हलाखीची झालेली असताना देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये सरकार दिरंगाई करत आहे, सरकारच्या वेळकाढू धोरणामुळेच ही घटना घडली आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाकडून देण्यात येत आहे.



@@AUTHORINFO_V1@@