मुले पळविणा-या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |

यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन



यवतमाळ : मागील काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा गैरसमजतीतून मोठ्या प्रमाणात पसरत आहे. अशा वेळी अनियंत्रीत जमाव बहूरूपी, वाटसरू, भिकारी, अन्य संशयित किंवा निरपराध व्यक्तींना मारहाण करत आहेत. त्यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद सारख्या ठिकाणी अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच दोन-तीन घटनांमध्ये काही जणांचा मृत्युही झाला. त्यामुळे अशा अफवेला बळी पडू नये, असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
कायदा हातात घेवून कोणालाही मारहाण केल्यास अशा वेळी खूनाचा गुन्हा नोंद होवून आयुष्यभर जेलमध्ये घालवण्याची वेळ येऊ शकते. कोणताही संशय आल्यास कायदा हातात घेवून मारहाण न करता अशा व्यक्तींना ताब्यात ठेवून जवळच्या पोलीस ठाण्यास फोनद्वारे तात्काळ माहिती द्यावी. व्हॉट्सॲप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयामधून खात्री न करता मुले पळवून नेणारी टोळी आल्याची पोस्ट अनेकजन फॉरवर्ड करत आहे. त्यामुळे समाजात भीती आणी संशय वाढत चालला आहे. सोशल मिडीयावरील कोणत्याही गोष्टीवर खात्री पटल्याशिवाय विश्वास ठेवू नये. संशयितांबद्दल काही माहिती असल्यास यवतमाळ पोलीस नियंत्रण कक्ष ०७२३२-२५६७०० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@