जनतेनी अफवांवर विश्वास ठेवू नये : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |
 
 

नशिक : धुळे येथे जे काही झाले ते अत्यंत दुर्दैवी असे असून या घटनेमधील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. धुळे येथे गेल्या रविवारी फक्त अफवेवरून राईनपाडा या गावातील नागरिकांनी पाच जणांची हत्या केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 
 
'धुळेमध्ये फक्त संशयावरून गावकऱ्यांनी पाच नागरिकांची हत्या केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुखद अशी घटना आहे. त्यामुळे राज्यातील जनतेनी कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले. याचबरोबर धुळेतील पोलिसांना सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून हत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेकांना यात अटक करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देखील घोषित करण्यात आली आहे.


 
 
गेल्या रविवारी राईनपाड्यातील गावकऱ्यांनी मुले पळवणारी टोळी समजून गावात आलेल्या पाच नागरिकांची बेदम मारहाण करून हत्या केली होती. या घटनेमुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघालेले होते. यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल राईनपाड्याला जाऊन भेट दिली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@