
मगरींचे स्थलांतर करताना मगरींच्या पुढील दोन पायाखाली कॉटनच्या दोरीचा फास टाकला जातो. त्यामुळे मगरीला हलता येत नाही. मगरीला उचलून प्राण्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या १० फूट खोक्यामध्ये टाकले जाते. ते खोके टेम्पोमध्ये टाकून क्वारंटाइन परिसरात आणण्यात आले. खोक्यातील मगरींना पिंजर्यात सोडण्यात आले, तर माकडांना खाण्याच्या ठिकाणी आणण्यात आले. तेथे लावलेल्या वाहतुकीच्या खोक्यात ते येतात. त्यानंतर ते खोके टेम्पोमध्ये टाकून फोरेटाईन येथे आणून येथील पिंजर्यात सोडण्यात आले, असेही कोमल राऊळ यांनी सांगितले.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचा कायापालट करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे नवीन पिंजरे बांधून दुर्मीळ प्राणी-पक्षी आणले जाणार आहेत.
दीड वर्षात नूतनीकरण
पिंजर्यांचे नूतनीकरण येत्या दीड वर्षात होणे अपेक्षित आहे. नूतनीकरण झाल्यानंतर टप्पाटप्याने प्राण्यांना नवीन पिंजर्यांमध्ये हलविण्यात येईल.
संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय